
प्रतिनिधी नागपूर
नागपूर दि. 30 : आँटोमेटीव्ह चौकात असलेल्या गुरु गोविंदसिंग स्टेडीयमचे नामांतर आता गुरु गोविंदसिंग सेंटर असे करण्याला संमती देण्यात आली आहे. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यात या निर्णयाला मंजुरी देण्यात आली.
गुरुद्वार गुरुनानक दरबारच्या प्रतिनिधींनी आज पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांची भेट घेतली. गुरु गोविंद सिंग स्टेडीयम असल्याने शिख समाजाच्या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी अडचणी येत होत्या. ही अडचण लक्षात घेऊन नामांतर करण्याला संमती देण्यात आली आहे. यामुळे शिख समाजाच्या संगत व लंगरचे कार्यक्रमांचे आयोजन विनासायास होण्यात हरकत राहणार नाही, असेही पालकमंत्री डॉ. राऊत यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांच्या या सूचनेला प्रतिनिधी मंडळाच्या सदस्यांनी संमती दिली. यावेळी आमदार अभीजीत वंजारी, जिल्हाधिकारी विमला आर., महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी, पोलीस उपायुक्त सारंग आव्हाड, मलकियतसिंग, गुरुविंदर सिंग, कुक्कु मारवाह, जसमित सिंग भाटिया, कंवलजीत चौहान, टोनी जग्गी उपस्थित होते.
00000