
नागपूर दि. 09 : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने शेळी, कुक्कुटपालन व डेअरी फार्मिंग प्रशिक्षण कार्यक्रम 20 ते 24 सप्टेंबर दरम्यान राबविण्यात येणार आहे. स्वयंरोजगारांसाठी इच्छूक युवक-युवतींनी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आधुनिक शेळी व कुक्कुटपालन प्रशिक्षण देणे व त्याद्वारे स्वयंरोजगारासाठी लागणाऱ्या उद्योजकीय बाबींची सविस्तर माहिती देऊन स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे असा आहे.
या कार्यक्रमांतर्गत शेळी, कोंबडी, गाई-म्हशीच्या जातींची निवड, त्यांच्यावर होणारे रोग व लसीकरण, शेडचे बांधकाम, पोषक तत्वे व चारा व्यवस्थापन, विमा व्यवस्थापन, बाजारपेठ पाहणी तसेच प्रकल्प भेटीवर प्रशिक्षण आणि स्वयंरोजगार सुरू करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच यामध्ये कर्ज विषयक योजनांची माहिती, विक्री व्यवस्थापन, प्रकल्प अहवाल तयार करणे याबाबत सविस्तर माहिती देण्यात येईल.
प्रशिक्षणार्थींनी अधिक माहितीसाठी व प्रवेशासाठी एमसीईडी उद्योग भवन, पहिला माळा, सिविल लाइन येथे कार्यक्रम सहाय्यक अश्विनी शेंडे मोबाईल क्रमांक 7498769824 व प्रकल्प अधिकारी श्रीकांत कुलकर्णी 9403078760 यांना 19 सप्टेंबरपर्यंत संपर्क करावा असे, आवाहन प्रकल्प अधिकारी श्रीकांत कुळकर्णी यांनी केले आहे.