
विशेष पोलीस बंदोबस्त मुळे धांदल टळली
प्रतिनिधी / नागेश बोरकर- दवलामेटी (प्र)
नागपूर :- ३१ ऑगस्त कोरम चा अभाव मुळे तहकुब झालेली आमसभा आज दिनांक ११ सप्टेंबर रोजी घेण्यात आली. कोरम चा अभावा मुळे आमसभा घेता येत नाही हा नियम असुन या नियमाचा काटेकोर पालन करून विरोधकांचा विरोधाला समोर जाऊन ३१ ऑगस्ट ची आमसभा तहकूब केल्या मुळे ग्रामस्थांनी चांगलीच धस्की घेतली व भारी संखे ने मागिल रेकॉर्ड ब्रेक संखे ने नागरिक दवलामेटी चा आमसभेत उपस्थित झाले.नागरिकांची गर्दी एवढी वाढली कि शेवटीं आयोजकांनी सभागृहाचा बाहेर खुर्च्या हलून आमसभा पार पाडली.
नियमाचा काटेकोर पालन करणाऱ्या सरपंच सौ रीता ताई उमरेडकर यांचे गावकऱ्यांनी शब्द सुमनाने स्वागत केले. या पूर्ण सभेत वाडी पोलिसांची भूमिका अतिशय महत्वाची ठरली. पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्यामुळे सभा सुरळीत पार पडली त्यासाठी सरपंच मॅडम नी पोलिसांचे आभार मानले.आज ची सभा विशेष ठरली कारण यासभेत लोकांचा बहुमताने समित्या स्थापन करण्यात आल्या. तंटा मुक्ती अध्यक्ष पदी प्रकाश मेश्राम यांची निवणूक विशेष ठरली ७०% लोकांनी मतदानाचा कौल प्रकाश मेश्राम यांचा बाजूने दिल्याने त्यांची नियुक्ती तंटा मुक्ती अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
यासभेले ग्रामपंचायत सरपंच सौ रीता उमरेडकर, उपसरपंच प्रशांत केवटे, ग्रामविकास अधिकारी विष्णू जी पोटभरे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश मेश्राम, श्रीकांत रामटेके, सिद्धार्थ ढोके, गजानन जी रामेकर, सतीश खोब्रागडे, अर्चना बनसोड, शुभांगी पाखरे, साधना शेंद्रे, अर्चना चौधरी, रक्षा सुखदेवे , शीतल वानखेडे, शकुंतला अभ्यंकर, छाया खिल्लारे, तसेच माजी पंचायत समिती सदस्य सुजित अतिकारी, सुधिर करंजेकर, सामजिक कार्यकर्ते रोहित राऊत, रवी पाखरे, संदीप सुखदेवे, अरविंद बेले, अनिल मेश्राम, कैलास सिरसाठ,मधुकर गजभिये, जयकुमार नाईक, रेखा बोदलकर, सोमकूवर ताई, लोखंडे ताई, श्वेता सुखदेवे , चैत्रा पाटील, प्रिती वाकडे, पूजा हिवाळे, श्वेता हिवाळे, बोबडे ताई, शिंगाळे ताई, मंगला कांबळे व भारी संखे ने नागरीक उपस्थित होते.