
नागपुर :- कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव बघता शासनाने सर्व सण साधेपणाने साजरा करण्याची मार्गदर्शक सूचना जाहिर केलेली आहे. याबाबत जनजागृती करण्याकरीता पारडी पोलीस स्टेशन चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके यांनी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांना सोबत घेऊन कापसी खुर्द येथील घरसंसार नगर येथे जनता संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले. व नागरीकांना शासनाच्या मार्गदर्शक सुचनाचे पालन करण्याची विनंती केली. तसेच गावात अवैध दारू विक्री, अवैध व्यवसाय, गुंडगिरी करत असलेल्यांची तक्रार करण्याचे सांगितले!
पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके यांच्या जनता संवाद कार्यक्रमाला नागरींकाचा प्रतिसाद मिळण्याकरीता कापसी खुर्द येथील सरपंच सुरज पाटील, उपसरपंच अक्षय रामटेके, ग्रामपंचायत सदस्य सलिम शेख, ममता बांगडे यांनी पुढाकार घेतला नागरीकांनी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित दर्शविली!