Breaking News

गावातील सरपंचाने अवैध दारूविक्री विरोधात शासनाला दिले निवेदन

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर

चिमूर :- चिमूर तालुक्यातील महादवाडी गावामध्ये सर्रास अवैधरित्या दारू विक्रीला उधाण आले असून अवैध दारुविक्रेत्यांनी गावात धुमाकूळ घातलेला आहे. त्यामुळे एका महिलेने चक्क टेन्शनमध्ये दारू पिऊन धिंगाणा घातला. असे प्रकार गावच्या सुविकासासाठी प्रयत्नशील असणारे महादवाडी चे सरपंच भोजराज कामडी यांना पहावले नाही.

म्हणून त्यांनी त्याविरोधात आवाज उठविला असता, दारू विक्रेत्यांकडूनच त्यांना व ग्रा. पं. च्या इतर सदस्यांना धोका निर्माण झालेला आहे. या दारू विक्रीचा गावच्या विकासावर व समाजमनावर होणाऱ्या विपरीत परिणामाला आळा घालण्यासाठी सरपंचांनी दारूबंदी साठी शासनाकडे मदतीची याचना केली आहे. गावचे विकास, आरोग्य व समाज ठिक राहावा,गावातील सरपंचाने अवैध दारूविक्री विरोधात शासनाला दिले निवेदन

त्याकरिता पोलिसामार्फत अशा दारुविक्रेत्यांवर कारवाई करून गावात दारूबंदी करण्यात यावी. यासाठी सरपंच यांनी जिल्हा अधिकारी चंद्रपूर, मुख्यमंत्री ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री पवार साहेब, पालकमंत्री वडेट्टीवार साहेब, आमदार बंटीभाऊ भंगडीया तसेच जि. प. गटनेते वारजूरकर यांना यासमबंधी ग्राम पंचायत मार्फत २१ सप्टेंबर २०२१ रोजी पत्र दिलेले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

पोलिसांनी पकडले रात्रीच्या अंधारात रेतीने भरलेला ट्रॅक्टर

रेती माफियांना आशिर्वाद कुणाचा? महसूल अधिकारी कोमात का? जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर : – चिमूर …

अवैध रेती उपसा व मुरूम उत्खनन करणाऱ्यांची चौकशी करून तात्काळ कारवाई करा

गजानन बुटके यांचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यात नदी पात्रातील मोठ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved