Breaking News

गावकऱ्यांनी पकडला अवैधरीत्या रेती तस्करी करणारा ट्रॅक्टरला

जिल्हा प्रतिनिधी – सुनिल हिंगणकर

चिमूर:-चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यांमध्ये नेरी वरून जवळच असलेल्या खुटाळा येथिल गावकऱ्यांनी अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरला मध्यरात्री पकडले यात ट्रॅक्टर चालक अरेरावी करीत होता रेती खाली करून पळण्याचा प्रयत्न करीत होता आणी तेव्हा मंडळ अधिकारी यांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर चालवण्याचे प्रयत्न केला अशी माहिती खुटाळा वाशीयांनी दिली‌.

सविस्तर वृत्त असे की, खुटाळा, मोटेगाव, गोरवट येथुन मोठ्या प्रमाणात अवैध रेती तस्करीचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असते. रात्रभर चालणाऱ्या या रेती तस्करीच्या खेळाकडे मात्र प्रशासन लक्ष देत नाही. त्यामुळे गावकऱ्यांनीच पुढाकार घेत. दिनांक 25/09/2021 ला रात्रीच्या वेळी रेती भरलेला ट्रॅक्टर हा गोरवट घाटावरून खुंटाळा मार्गे रेतीची तस्करी करीत असताना खुटाळा येथे गावकऱ्यांनी पडकला. याची माहिती प्रशासनाला दिली मात्र प्रशासनाने रात्री कारवाई न करता दिनांक 26/09/2021 ला कारवाई करण्यासाठी मंडळ अधिकारी कुमरे, तलाठी मोटेगाव व पोलीस विभागाचे कर्मचारी यांना पाठविण्यात आले.

मात्र रेती तस्करीकऱ्यांच्या उन्माद इतका की त्यांनी खुद्द मंडळ अधिकारी यांचे अंगावर ट्रॅक्टर चढविण्याचा प्रयत्न केला. नंतर मोठ्या जबरीने मंडळ अधिकारी, तलाठी व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सदर ट्रॅक्टर तहसील कार्यालयाला जमा करण्यात आला आहे . पुढील कार्यवाही चिमूरचे उपवीभागीय अधीकारी ट्रॅक्टर मालकावर १ लाख १० हजार दंड ठोठावणार आहे अशी माहीती मंडळ अधीकारी यांनी दिली .मात्र यापुढे अवैधरित्या रेती तस्करी करुन भरधाव वेगाने ट्रॅक्टर चालविणाऱ्यावर वाॅच ठेवून प्रशासन कारवाई करेल काय याकडे नेरी मोठेगाव खुटाळा अन्य परीसरातील नागरीकांचे लक्ष लागले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मराठी शाळेतूनच अनेक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास -शैलेंद्र वासनिक

खांबाडी येथे शाळापूर्व तयारी मेळाव्यात मार्गदर्शन जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- आपल्या गावातील जिल्हा परिषद …

जिल्हाधिका-यांकडून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 22 : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved