
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
घुग्घुस :- वेकोलिमधिल कोळसाच्या खाण परीसरातील बंकर जवळ दोन व्यक्ती संशयास्पद फिरत होते, त्यांना हटकले असता सुरक्षा रक्षकास दोघांनी अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली असल्याची घटना रविवार दिनांक-17/10/2021 ला सकाळी 8:30 वाजताच्या सुमारास घडली. सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून बल्लू उर्फ मोहम्मद सदाफ (वय 23), रजनीकांत उर्फे भोला गिरी (वय 20) अशी अटकेतील आरोपींची नावे आहे. फिर्यादी सुरक्षा रक्षक वैभव निमकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कलम 353,332,504,506 (34) 120 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार राहुल गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.संजय सिंह करीत आहे.