
प्रतिनिधी-कैलास राखडे
नागभीड :- राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय, नागभीड येथे “वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज” यांची पुण्यतिथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल एन. कोरपेनवार यांचे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. तर या कार्यक्रमात डॉ. जी. डी. देशमुख डॉ. विकास मोहतुरे डॉ. आर. जे. रुडे मॅडम यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या निमित्याने उपस्थित मान्यवरांनी यांनी “राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामोन्नतीतून राष्ट्रीय विकास साधता येतो अशी शिकवण ग्रामगीता या ग्रंथातून दिला आहे.” असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अनिल कोरपेनवार सर यांनी ” संतांनी स्वानुभूतीतून दिलेली शिकवण अंगिकरावी.”असे सांगितले.
यावेळी संचालन प्रा. प्रचाल ढोक यांनी केले तर आभार प्रा. चक्रधर भुर्रे यांनी मानले. कार्यक्रमाचा समारोप तुकडोजी महाराज यांना आदरांजली वाहून व राष्ट्रवंदनाने करण्यात आली. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.