
विषेश प्रतिनिधी
पुणे :- कार्ला परिसरातील एका बंगल्यावर पोलिसांनी केली मोठी कारवाई, बंगल्यात सुरु असलेल्या डान्स पार्टीवर छापा टाकून ९ पुरुष आणि ८ महिलांवर गुन्हा दाखल करुन ७४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
दिलेल्या माहितीनुसार, कार्ला गावच्या हद्दीत एम. टी.डी.सी. जवळ दुर्गा सोसायटीतील तन्वी बांगल्यामध्ये काही लोक (म्युझिक सिस्टम) स्पीकरवर गाणे लावून त्यावर अश्लिल हावभाव करीत नाचत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली.मिळालेल्या माहितीआधारे पोलिसांनी दोन पथके तयार केली व दुर्गा सोसायटीतील तन्वी बंगल्यावर छापा टाकला असता,त्यावेळी ९ पुरुष आणि ८ महिला गाण्याच्या तालावर नाचत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी १७ जणांना अटक केली.
पोलिसांनी ऋषिकेश संजय पठारे, अमित कृष्णा मोरे, योगेश संदेश काशिद, विकास रामचंद्र पारगे, कैलास मारुती पठारे, स्वप्नील जगदीश तापकीर, विनोद रमेश डख, प्रसाद बाळासाहेब विर, नागेश कुंडलीक थोरवे (सर्व रा. चोली) यांच्यासह ८ महिलांवर कारवाई करण्यात आली आहे.पोलिसांनी या ठिकाणाहून रोख रक्कम, मोबाईल फोन, ५ चारचाकी वाहने, स्पीकर असा एकूण ७४ लाख २७ हजार ६३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधीकारी राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रविण मोरे, पोलीस उपनिरीक्षक सचिन बनकर, सहायक फौजदार युवराज बनसोडे, पोलीस हवालदार खान, शेख, पवार, कदम, बोराडे, कोहिनकर, चालक पोलीस नाईक प्रणयकुमार उकिर्डे यांच्या पथकाने केली.