Breaking News

Classic Layout

बाबा जुमदेवजी यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री यांच्यावर गुन्हा दाखल करा

नागपुरातील कळमना पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर:-भंडारा येथील मोहाडी मध्ये बागेश्वर धामचे महाराज धिरेंद्र शास्त्री यांचा 28 मार्च पासून प्रवचनाचा कार्यक्रम सुरू आहे. याच कार्यक्रमामध्ये दिनांक 29 मार्च रोजी धिरेंद्र शास्त्री यांनी आपल्या अनुयायांना मार्गदर्शन करीत असताना महानत्यागी बाबा जूमदेवजी यांचे विचार व कार्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली …

Read More »

पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई- भगवानबाबा विद्यालय बालमटाकळी परिक्षा केंद्रावर धुडगुस घालणा-या आरोपींना तात्काळ अटक

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:- दिनांक- 29 मार्च 2024 शुक्रवार – शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीतील भगवानबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बालमटाकळी ता.शेवगाव या ठिकाणी दिनांक 26/03/2024 रोजी सकाळी 10/30 वाचे सुमारास भुगोल या विषयाचा इयत्ता 10 वीचा पेपर होता. सदर शाळेवर दहावीचा भुगोल या विषयाचा पेपर चालु होता. …

Read More »

‘चैत्र चाहूल’चे २०२४ चे ध्यास सन्मान जाहिर

जेष्ठ रंगकर्मी अतुल पेठे आणि लोककलावंत मनोहर गोलांबरे यांना जाहीर मुंबई राम कोडींलकर मुंबई:-‘चैत्र चाहूल’तर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या ‘ध्यास सन्मान’ या पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. दीर्घकाळ सकस काम करणारा प्रयोगशील लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, निर्माता म्हणून परिचित असलेले जेष्ठ रंगकर्मी अतुल पेठे तसेच गेली ४० वर्षाहून अधिक काळ संगीत …

Read More »

उद्या नागपूर विभाग ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर :- नागपूर विभाग ग्रंथालय संघ व भंडारा जिल्हा ग्रंथालय संघ यांचे संयुक्त विद्यमाने वार्षिक अधिवेशन उद्या दिनांक ३१ मार्च रोजी भंडारा येथे आयोजित केले आहे.अधिवेशनाचे उदघाटन भंडारा जिल्हा ग्रंथालय संघ अध्यक्ष धनंजय दलाल यांचे हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ.गजानन कोटेवार राहणार आहेत. …

Read More »

संचमान्यतेचे सुधारित निकष रद्द करण्याची शिक्षक भारतीची मागणी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-संचमान्यतेचे सुधारित निकष विहित करणारा शासन निर्णय आरटीई काय‌द्याशी विसंगत असून हजारो शिक्षकांना अतिरिक्त करणारा तसेच दुर्गम भागातील शाळा बंद करणारा आहे.विद्यार्थ्याला प्रत्येक विषयाला शिक्षक आणि कला, क्रीडा व संगीत शिकण्याचा अधिकार नाकारणारा हा शासन निर्णय आहे.हा शासन निर्णय रद्द करण्यात यावा यासाठी शिक्षक भारतीने मुख्यमंत्री व …

Read More »

रामटेकमधून सात उमेदवारांचे अर्ज मागे, नागपुरातून एकही अर्ज मागे नाही

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नागपुरातून 26 तर रामटेकमधून 28 उमेदवार नागपूर, दि. 30 – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी अर्ज मागे घेण्याच्या आज अखेरच्या दिवशी रामटेक लोकसभा मतदारसंघातून सात उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. तर नागपूर लोकसभा मतदारसंघातून एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही. नागपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची संख्या एकाही उमेदवाराने अर्ज …

Read More »

पुयारदंड येथील नागरिकांकडून अवैध रेती वाहतुकीच्या विरोधात हल्लाबोल

गावातील युवकांच्या अंगावर ट्रॅक चालवीण्याचा प्रयत्न, पोलीस स्टेशन भिसी कडून ट्रॅक ड्रायवर व अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक जप्त जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर /भिसी:-वैनगंगा नदीपात्रातील ‘रेती’ या राष्ट्रीय संपत्ती ची कांपा- शंकरपूर-भिसी ह्या मार्गाने नागपूर,उमरेड,गिरड, सिर्शी या ठिकाणी मोठया प्रमाणात अवैध पद्धतीने रेती वाहतूक करणाऱ्या ठेकेदारांची संख्या वाढली असून रेती …

Read More »

सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधानच्या ‘लग्न कल्लोळ’चे ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर जोरदार स्वागत

मुंबई-राम कोडींलकर मुंबई:-लवकरच लग्नसराईची धुमशान संपूर्ण महाराष्ट्रात सुरु होणार आहे. त्यापूर्वीच ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीने संपूर्ण महाराष्ट्रात जबरदस्त गाण्यांसाह सर्वत्र धुमाकूळ घातलेल्या ‘लग्न कल्लोळ’ या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर करून आपल्या ओटीटी प्रेक्षकांना सरप्राईज गिफ्ट दिले आहे. महाराष्ट्रातील चित्रपट रसिक प्रेक्षक हा सुवर्णयोग मनस्वी अनुभवत आहेत.श्रुती आणि अथर्व एकमेकांवर …

Read More »

रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी वैधरित्या नामनिर्दिष्ट उमेदवारांची यादी

नागपूर, दि. 29 – रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी दि. 28 मार्च रोजी झालेल्या छाननीअंती ३५ उमेदवार वैध ठरले आहेत. यात ३ राष्ट्रीय व राज्य स्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे उमेदवार, १३ नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार आणि १९ अपक्ष असे एकूण ३५ उमेदवार वैध ठरले आहेत. वैधरित्या नामनिर्दिष्ट उमेदवारांमध्ये राजू पारवे (शिवसेना), श्यामकुमार …

Read More »

सामान्य निवडणूक निरीक्षकांची मिडीया सेंटरला भेट

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 28 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने 13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी जाहिरातींचे प्रमाणीकरण, पेड न्यूज, फेक न्यूज, समाज माध्यमांवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती (एम.सी.एम.सी) स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे कार्य जिल्हा माहिती कार्यालयाच्या मिडीया सेंटर येथून सुरू असून या सेंटरला …

Read More »
All Right Reserved