
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- आपल्या बाईकने चंद्रपूर वरून ड्युटी करून घरी परत येत असताना बल्लारपूर महामार्गावरील टोलनाका येथील पावर हाऊस जवळ बिबट रोड क्रॉस करीत असताना बाईक सवार पोलीस कर्मचारी अपघातात ठार झाल्याची घटना आज दिनांक ४ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली असून मृतक पोलीस कर्मचारी यांचे नाव ASI अविनाश पडोळे असल्याचे सांगितले आहे.
ड्युटी पुर्ण करून अविनाश पडोळे हे घरी परत येत असताना अचानक बिबट रोडवर बघताच बाईकचा नियंत्रण सुटला आणि ही घटना घडली असून जख्मी अविनाशला तातडीने जवळील बल्लारपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले. शरीरावर गंभीर जख्मा असल्यामुळे त्यांना सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले उपचार दरम्यान त्याचा मृत्यु झाला.
बल्लारपूर महामार्गावर रात्रीच्या सुमारास वाघ, बिबट फिरतांना बऱ्याच लोकांनी बघितलेले आहे. पण आता भर दिवसा बिबट आपला शिकारच्या शोधात फिरताना दिसून येत आहे. या परिसरात नेहमी वाघ बिबटचा वावर असतो तेव्हा वनविभागाने यांचा बंदोबस्तसाठी काही ठोस कारवाही करावी असे ग्रामस्थांची मागणी आहे.