Breaking News

विद्येच्या माहेरघरात बोगस पीएचडी पदव्यांचा सुळसुळाट

स्प्राऊट्स Exclusive

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर
९७६८४२५७५७

पुणे:-पुणे येथील पर्वती विधानसभा मतदारसंघातून तीन वेळेला विजयाची हॅटट्रिक करणाऱ्या माधुरी सतीश मिसाळ यांच्या पूजा या कन्या. या कन्येने कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी ( टोंगा ) मधून बोगस ऑनररी पीएचडी घेतलेली आहे. या विद्यापीठातून नियमबाह्य पद्धतीने ऑनररी पीएचडी पदव्या विकल्या जातात, म्हणून पुण्यात वानवडी पोलीस स्टेशनमध्ये ‘एफआयआर’ देखील झालेला आहे, तोही महाराष्ट्राच्या उच्चशिक्षण विभागाकडून. तरीही हा गोरखधंदा खुलेआम चालू आहे.

पुणे हे तर विद्येचे माहेरघर, मात्र या पुण्यनगरीतही बोगस पीएचडी विकण्याचा गोरखधंदा सुरु आहे. आजवर या बोगस विद्यापीठांवर अनेक वेळेला तक्रारी करण्यात आल्या, अगदी एफआयआर सुद्धा झाले, चार्जशिटही देण्यात आली, काही वेळेला तर प्रकरण न्यायालयातही गेले. मात्र हा धंदा बिनबोभाट चालू आहे.

अशा प्रकारची फेक ऑनररी पीएचडी विकत घेण्याची किंमत ही ५ हजारांपासून १ लाख रुपयांपर्यंत घेण्यात येते व हा कथित पदवीदान सोहळा एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात येतो. वास्तविक हा कार्यक्रम घेणेही अवैध असते. मात्र या कार्यक्रमात सेलेब्रिटी मंडळी व राजकीय पुढारी यांनाही जाणीवपूर्वक आमंत्रित करण्यात येते. त्यामुळे पोलिसांना माहित असूनही ते कारवाई करायला धजावत नाहीत.

फेक ऑनररी पीएचडीचे रजिस्ट्रेशन हे प्रामुख्याने विद्यापीठाच्या वेबसाइटवरून केले जाते. या वेबसाईटचा लूकही पाश्चात्य पद्धतीने बनवला जातो. या भुलभुलैयाला माणूस भुलतो व बोगस पीएचडी खरेदी करतो. आतापर्यंत या गोरखधंद्यात अनेकांना पोलिसांनी पकडले आहे. मात्र तुरुंगातून जामिनावर सुटून आल्यावर ते पुन्हा याच काळ्या धंद्यात प्रगती करतात. यापैकी काहीजणांनी तर स्वतःच स्वयंसेवी संस्था काढल्या व नावात ‘युनिव्हर्सिटी’ शब्द टाकून पीएचडी विकण्याचा गोरखधंदा सुरु केला आहे.

पुण्यात सध्या द ओपन इंटरनॅशनल यूनिवर्सिटी ऑफ कम्प्लीमेंटरी मेडिसिन (श्रीलंका), कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी ( टोंगा ), यूनिवर्सिटी ऑफ साउथ अमेरिका यूनिवर्सिटी ऑफ अमेरिका हवाई, आयनॉक्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ( Inox University ), WAC People Council and International Open University of Humanity Health Science and Peace, USA अशा प्रकारच्या बोगस विद्यापीठांचे दलाल कार्यरत आहेत.

यापैकी कुठल्याही विद्यापीठांना भारतातील युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनची ( युजीसी )मान्यताही नाही, इतकेच नव्हे तर ही विद्यापीठे त्यांच्या देशातही बोगस आहेत. तरीही नियमबाह्य पद्धतीने हे नकली पीएचडी पदव्या विकतात व नावापुढे कष्ट न घेता ‘डॉ.’ लावता येते, म्हणून लोक खरेदीही करतात. मात्र अशा प्रकारे नावापुढे ‘डॉक्टर’ लावणे हा कायद्याने गुन्हा आहे.

वाचकांच्या आग्रहास्तव पुन्हा या बोगस विद्यापीठ व बेकायदेशीरपणे पीएचडी वाटप करणाऱ्या संस्थांची यादी प्रसिद्ध करीत आहोत:

ओपन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन, श्रीलंका,
अमेरिका हवाई विद्यापीठ आणि आयनॉक्स आंतरराष्ट्रीय विद्यापीठ,
कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी, टोंगा,
युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ, अमेरिका,साऊथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटी
अमेरिकन युनिव्हर्सिटी, यूएसए,
झोराष्ट्रीयन युनिव्हर्सिटी,
सॉर्बोन युनिव्हर्सिटी, फ्रान्स,
महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन – (NGO)
एम्पॉवर सोशल अँड एज्युकेशन ट्रस्ट – (NGO)
नेल्सन मंडेला नोबेल पुरस्कार अकादमी – NGO
डिप्लोमॅटिक मिशन ग्लोबल पीस – NGO
मानव भारती विद्यापीठ (MBU), हिमाचल प्रदेश
मानव भारती विद्यापीठ, सोलन
विनायक मिशन्स, सिंघानिया.
अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ ग्लोबल पीस
छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठ, कानपूर
अमेरिकन हेरिटेज युनिव्हर्सिटी ऑफ साऊथन कॅलिफोर्निया (AHUSC)
पीस युनिव्हर्सिटी
ट्रिनिटी वर्ल्ड युनिव्हर्सिटी, युके
सेंट मदर टेरेसा युनिव्हर्सिटी
अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ ग्लोबल युनिव्हर्सिटी
जीवा थिऑलॉजिकल ओपन युनिव्हर्सिटी
वर्ल्ड पीस इन्स्टिटयूट ऑफ युनायटेड नेशन्स
ग्लोबल ह्यूमन पीस युनिव्हर्सिटी
भारत व्हर्चुअल युनिव्हर्सिटी फॉर पीस अँड एज्युकेशन
नॅशनल ग्लोबल पीस युनिव्हर्सिटी
बल्सब्रिज युनिव्हर्सिटी
श्री दादासाहेब फाळके इंटरनॅशनल अवॉर्ड फिल्म फॉउंडेशन (एनजीओ )
इंटरनॅशनल ओपन युनिव्हर्सिटी ऑफ ह्यूमॅनिटी हेल्थ सायन्स अँड पीस, यूएसए
हर्षल युनिव्हर्सिटी
इंटरनॅशनल इंटर्नशिप युनिव्हर्सिटी

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

पोलिसांनी पकडले रात्रीच्या अंधारात रेतीने भरलेला ट्रॅक्टर

रेती माफियांना आशिर्वाद कुणाचा? महसूल अधिकारी कोमात का? जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर : – चिमूर …

अवैध रेती उपसा व मुरूम उत्खनन करणाऱ्यांची चौकशी करून तात्काळ कारवाई करा

गजानन बुटके यांचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यात नदी पात्रातील मोठ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved