प्रतिनिधी जगदीश का. काशिकर
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबई: मागाठाणे विधानसभा प्रभाग क्रमांक 5 येथे माजी नगरसेवक आणि मुंबई प्रदेश भाजपा उपाध्यक्ष प्रकाश दरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी दिनांक 10/12/2022 रोजी आरोग्य शिबीरासह रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, शिलाई प्रशिक्षण केंद्र, ज्येष्ठ नागरिक सत्कार व कांबळ वाटप या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांचे उदघाटन भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी, आ. मनीषा चौधरी, जिल्हाध्यक्ष गणेश खणकर उपस्थित होते. सदर कार्यक्रमात विभागातील नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन आ. प्रविण दरेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.