Breaking News

भारत देशातील हत्तीरोग सार्वत्रिक औषोधोपचार मोहिमेचा शुभारंभ चिमूर शहरातून,, ७८ पर्यवेक्षकांची निवड

तहसीलदार तुलसीदास कोवे यांनी केले उद्घाटन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-देशातील हत्तीरोगाचे उच्चाटन करण्याच्या अनुशांगणे हत्तीरोग सार्वत्रिक औषोधपचार मोहिमेचा शुभारंभ चंद्रपूर जिल्हातील चिमूर येथून करण्यात आला, ही मोहीम ९ जानेवारी ते १९ जानेवारीदरम्यान राबविण्यात येणार आहे, मोहिमेचे उद्घाटन पंचायत समिती सभागृहात तहसीलदार तुलसीदास कोवे, सहाय्यक गट विकास अधिकारी सरोज सहारे, गटशिक्षण अधिकारी नाट यांनी प्रत्यक्ष गोळ्या खाऊन केले, या मोहीमेकरीता ७८ पर्यवेक्षक आणि २७० जणांची चमूची निवड करण्यात आली आहे,

कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून नागपूर विभागाचे सहायक संचालक डॉ. निमगडे, जागतिक आरोग्य संघटनेचे राज्य सल्लागार डॉ. राजेंद्र सिंह, यांचेसह जागतिक आरोग्य संघटनेचे विभागीय सल्लागार डॉ. भाग्यश्री त्रिवेदी, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रतिक बोरकर, चिमूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ, आश्विन अगडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ललित पटले, आरोग्य विस्तार अधिकारी सोरदे आदी उपस्थित होते, चिमूर तालुक्यातून हत्तीरोग हदपार करण्यासाठी प्रत्येक नागरीकानी आपल्या घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्याकडून देण्यात येणाऱ्या गोळ्यांचे सेवन त्यांच्या समक्ष करण्याचे आव्हान उपस्थित मान्यवरांनी केले, यावेळी अनेक आरोग्य कर्मचारी उपस्थित होते,

*तीन प्रकारच्या गोळ्याचे वितरण*

या मोहीमेदरम्यान तीन प्रकारच्या गोळ्या देण्यात येणार आहेत, अव्हर मेक्टिन ही गोळी उंचीनुसार, डीईसी गोळी वयानुसार व अल्बेंडाझोल ही गोळी प्रत्येकी एक या प्रमाणे द्यायची आहे, या गोळ्याचे सेवन दोन वर्षाखालील बालकांनी, गरोदर मातानी, सात दिवसाच्या सत्नदा मातांनी, आणि अती गंभीर आजारी व्यक्तींनी करू नये या गोळ्या उपासीपोटी घेऊ नये, असे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. बोरकर यांनी सांगितले आहे, सर्व नागरिकांनी आपल्या घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करून त्यांच्या समक्ष गोळ्या सेवन करावे असे आवाहन चिमूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ललित पटले यांनी केले आहे,

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

तीन अल्पवयीन मुलींना गावातीलच एका भामट्याने फुस लावून पळून नेले-पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-दिनांक 25 एप्रिल 2024 वार गुरुवार याबाबत सविस्तर वृत्त असे …

विद्यार्थ्यांचा संस्कार शिबिरातून सर्वांगीण विकास शक्य -वाय. सी. रामटेके

सुसंस्कार शिबिर प्रारंभ जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- एप्रिल महिन्यात परिक्षा संपली की विद्यार्थी -विद्यार्थ्यींनींनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved