
विशेष प्रतिनिधी बेलापूर
बेलापूर:-ग्रामविकास अधिकारी. बेलापूर बु।। ग्रामपंचायत कार्यालय ता. श्रीरामपूर. अहमदनगर यांना निवेदन देण्यात आले असून या निवेदनात सांगितले आहे की आम्ही गौसे आजम सेवाभावी संस्था बेलापूर या संस्थेचे पदाधिकारी असून आम्ही सामाजिक प्रश्न सोडविणेसाठी नेहमी प्रयत्नशिल असतो कायद्याचा अनादर करणा-यां वर कारवाई व्हावी म्हणून शासन दरबारी प्रश्न मांडून ते प्रश्न मार्गी लावून समाजकार्य करीत असतो,
बेलापूर येथे प्रवारा नदी तिरावर आठवडा बाजार भरत असतो. हा आठवडा बाजार मोठया प्रमाणावर भाजीपाला विक्रेते येत असतात तसेच या आठवडा बाजारासाठी बाहेरगावचे। व्यापारी तसेच लांबून लांबून ग्राहक येत असतात त्यामुळे हा आठवडा बाजार सायंकाळी बराच उशीरापर्यंत चालू असतो.
परंतू या आठवडे बाजाराचे ठिकाणी स्ट्रीट लाईट नसल्यामुळे व्यापारी तसेच ग्राहकांना खूपच त्रास होतो अंधारात भाजीपाला व इतर वस्तुंची खरेदी करावी लागते. या बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते स्ट्रिट लाईट नसल्यामुळे चोऱ्या मऱ्या तसेच लुटमार नेहमीच होत असून आतापर्यंत अंधाराचा फायदा घेवून चोरटयांनी अनेकांच मोबाईल लांबविले आहेत. तरी व्यापारी तसेच ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी आपण आठवडे बाजारात त्वरीत स्ट्रिट लाईट बसवावेत जेणेकरून व्यापारी व ग्राहकांची गैरसोय दूर होऊन सर्व व्यवहार उशीरापर्यंत सुरळीतपणे चालू शकतील.
तरी आठवडे बाजारात येत्या १५दिवसांत स्ट्रिट लाईट बसविण्यात यावे अन्यथा एकही व्यापारी ग्रामपंचायतीची पावती फाडणार नाही तसेच आमचे गौसे आजम सेवाभावी संस्थेच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह उग्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल मग होणा-या सर्व परिणामांची जबाबदारी ही ग्रामपंचायत प्रशासनाचीच राहिल याची कृपया नोंद घ्यावी.यावेळी गौसे आजम सेवा भावी संस्थेचे संस्थापक मुख़्तार सय्यद, अध्यक्ष सुल्तान शेख,जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, सरपंच महेंद्र सालवी,उपसरपंच अभिषेक खंडागळे, ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख, , संस्थेचे सदस्य जाकिर बागवान, अजीज शेख भीम गर्जना तालुका अध्यक्ष रफीक शाह,उपस्थित होते