
प्रतिनिधी जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
ठाणे: ठाणे शहरातील श्री राजस्थान श्वेतांबर मूर्तिपूजक संघ ठाणे शहर यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री शंखेश्वर पार्श्वनाथ मंदिराच्या भव्यतीभव्य अंजनशलाका प्राणप्रतिष्ठा महामहोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहून मनोभावे दर्शन घेतले तसेच जैन बांधवांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी जैन समाजाच्या वतीने करण्यात आलेल्या सन्मानाचा विनम्रतापूर्वक स्वीकार करून या शांतीप्रिय समाजाला सर्वतोपरी सहकार्य करू असे सांगून आश्वस्त केले. तसेच अशा धार्मिक कार्यक्रमांमुळे समाजाला नवी ऊर्जा मिळते अशी भावना देखील बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. ठाण्यात दहा दिवस हा महोत्सव चालणार असून त्यात अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे ठाणे शहरात आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे विशेष कौतुक केले.
यासमयी ठाण्याचे माजी महापौर आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे महाराष्ट्र समन्वयक नरेश म्हस्के, शाखाप्रमुख निखिल बुडजडे, उपविभागप्रमुख स्वानंद पवार, मंदिराचे व्यवस्थापकीय संचालक उदय परमार, रमेशकुमार पुनमिया, उत्तमचंद ढलेरियावोराया इतर सर्व मुख्य पदाधिकारी तसेच जैन समाजबांधव उपस्थित होते.