
0 ते 18 वर्ष वयोगटातील बालकांची होणार तपासणी
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-महाराष्ट्र राज्य शासनाने सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत 9 फेब्रूवारी पासून “जागरूक पालक सुदृढ बालक” विशेष अभियान राबविण्याचे नीच्छित केले आहे. राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, एकात्मिक बाल विभाग, शिक्षण विभाग, व समाजकल्याण विभाग यांचे समन्वयाने सदर अभियान राबविण्याचे निछित करण्यात आले आहे. दिनांक ९ फेब्रुवारी २०२३ रोजी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे आरोग्य विभाग चिमूर यांचे वतीने जागरूक पालक सुदृढ बालक अभियानाची सुरुवात चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तीकुमार भांगडीया यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी उपजिल्हा रुग्णालय वैदकिय अधीक्षक डॉ अश्विन अगडे, तालुका वैधकीय अधिकारी डॉ.ललित पटले, वैधकिय अधिकारी डॉ. पिसे मॅडम, डा विश्वास महाबळे, समुपदेशक कामिनी हलमारे, उपस्थित होते, ९ फेब्रुवारी पासून सुरू करण्यात आलेल्या जागरूक पालक सुदृढ बालक अभियानासाठी चिमूर तालुक्यातील ५२८ शाळा व अंगणवाडी केंद्रावर भेट देऊन तपासणी करण्यात येणार असून २५ टीम तयार करण्यात आली आहे, त्यामाध्यमातून ४३ हजार ० ते १८ वयोगटातील बालकांची तपासणी करण्यात येणार आहे अशी माहिती तालुका वैधकिय अधिकारी डॉ.ललीत पटले यांनी ज्वाला समाचार प्रतिनिधीशी बोलताना दिली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी डा हलगे, कल्पना जंगीटवार, कल्पना बावणे, मनीषा मैंदड, वाघमारे मॅडम, अक्षय सोनठक्के, विठ्ठल पवार, तुळसिदास दडमल, तालुका वैदयकीय अधिकारी कर्मचारी व उपजिल्हा रुग्णालय सर्व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले,