Breaking News

‘त्या’ बियाणे कंपन्यांचे परवाने रदद करा- आ.फुंडकर

‍खामगाव: विदर्भातील शेतकरी बोगस बियाण्यामुळे हवाल दिल, तातडीने चांगल्या दर्जाचे बियाणे पुरवावे.
पावसाने दगा दिल्यामुळे आधीच शेतकरी त्रस्त असतांना त्यातचे अनेक कंपन्यांनी बोगस बियाणे पुरवून शेतक-यांना आर्थीक अडचणीत आणुन त्यांचे हंगामाचे नुकसान केले आहे. बियाणे न उगवल्यामुळे शेतक-यांना पुन्हा पेरणी करावी लागत आहे. विदर्भांतील शेतकरी अडचणीत सापडला असून शेतक-यांना तात्काळ आर्थीक मदत देण्यात यावी किंवा चांगल्या दर्जाचे बियाणे पुरविण्यात यावे. यासोबत बोगस बियाणे पुरविणा-या कंपन्यांवर कठोर कारवाई करुन त्यांचे परवाने रदद करण्यात यावे अशी मागणी ॲड आकाश फुंडकर, खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष भाजपा बुलढाणा यांनी केली आहे.
‍ एकटया बुलढाणा जिल्हयात बोगस बियाण्याच्या शेकडो तक्रारी दाखल झाल्या असून विदर्भाचा आकडा हजारोच्या घरात जाऊ शकतो. पुर्णत: शेतीवर अवलंबून असलेल्या हजारो लोकांची फसवणुक करुन त्यांना आर्थीक गर्तेत ढकलेले आहे. शेतक-यांना दुबार पेरणी करावी लागणार असून त्यासाठी त्यांना पुन्हा ‍ बियाणे खरेदी करावे लागणार आहे. त्यासाठी त्यांना आर्थीक घडी बसवावी लागणार आहे. एकीकडे सातबारा कोरा करायचा आश्वासन देऊन अद्यापही शेतक-यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही. आणि दुसरीकडे बोगस बियाण्यामुळे पुन्हा पेरणीचा खर्च करावा लागणार आहे.
बोगस बियाणे व बिघाडी सरकारचे समिकरणच असल्याचे दिसते. सत्ता परिवर्तनानंतर पहिल्याच हंगामात बोगस बियाणे आले आणि शेतक-यांची लुट सुरु झाली आहे. बुलढाणा जिल्हयातच महाबीज, इगल, अंकुर, वसंत, कनक, श्री ॲग्रो, ऋषीकेश, यशवंत, वरदान, भाग्यश्री, के.डी.राम सीडस, देवगीरी, महालिड, रवी सिड, ओम दिव्या, हिरा मोती, बुस्टर, ग्रीन गोल्ड या कंपनीचे बियाणे निघाल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे राज्य सरकारने तात्काळ बोगस बियाणे देणा-या कंपन्यांवर कठोर कारवाई करत हया कंपन्यांचे परवाने रदद करावे अशी मागणी ॲड आकाश फुंडकर आमदार तथा जिल्हाध्यक्ष भाजपा यांनी कले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शेतकरी कर्जमुक्त योजनेच्या लाभार्थ्यांनी आधार प्रमाणिकरण करण्याचे आवाहन

नागपूर, दि.22 : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 अंतर्गत ज्या लाभार्थी शेतकऱ्यांनी अद्यापही आपले …

तलाठ्यानी सात बारा वर पीक पेरा नोंद करण्याची मागणी

राजू देवतळे यांच्या नेतृत्वात एसडीओ संकपाळ यांना निवेदन जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved