
वंचित बहुजन आघाडी व महाराष्ट्र राज्य महिला बचत गट पोषण आहार पुरवठा संगठन, यांनी केले आंदोलन
नागपुर :नागपुर जिल्हा तर्फे सयुक्तपणे गरम ताजा पोषण आहार तसेच कडधान्य वितरण च्या संदर्भात महाराष्ट्र शासनातर्फे होत असलेल्या भेदभावपूर्ण अन्यायकारक कारभाराच्या विरोधात आज दिनांक १४ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी १२ वाजता संविधान चौक, नागपुर येथे शहर अध्यक्ष रवीभाऊ शेंडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करन्यात आले.
मागील १५ वर्षापासून अविरत सेवा देनाऱ्या महिला बचत गटांचे आहार वितरनाचे काम बंद करून लाखों महिलांना बेरोजगार करनाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाचा विरोध करन्यात आला. खाजगी भांडवलदार महाराष्ट्र कंज्यूमर फेडरेशन ला दिलेला कडधान्य वाटपाचा ठेका रद्द करन्याची मागणी यावेळी करन्यात आली. मागणी मान्य न झाल्यास वंचित बहुजन आघाडी तर्फे संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारन्यात येनार असल्याचा इशारा देन्यात आला.
प्रसंगी वंचित बहुजन आघाडी चे नागपुर शहर अध्यक्ष रवीभाऊ शेंडे, नागेश बुरबुरे, धर्मेश फुसाटे, आनंद चौरे, प्रा. रमेश पिसे, नालंदा गनवीर, सुजाता वासनिक, मंजुशा सोनुले, माधुरी सोनटक्के, माया शेंडे, मंदा पाटील, संजय हेडाऊ, आनंद चौरे, अविराज थुल, रोशन बेहरे, अंकुश मोहीले, सिध्दांत पाटील, प्रा. अजय बोरकर, विनय भांगे, अश्विन मेश्राम, वैभव राऊत, गौतम पिल्लेवान, सुमित चौहान, भुपेश कांबळे, बबन वानकर, रमेश कांबळे, भावेश वानखेडे, संदेश खोब्रागडे, नरेंद्र गावंडे, रंजना गनवीर, अनिता बागडे, संघमित्रा चव्हान, अर्चना लक्षणे, लोभा लिहितकर, शकुंतला सोनटक्के, शितल गेडाम, सरोज कोड, मिना चिमनकर, अपेक्षा उपरे, सुनिता सहारे, सुषमा पखीड्डे, सविता अंबादे, ज्योती मेंढे, पोर्णिमा शेंडे, उशा बगडे, पोर्णिमा वाहाने, सुवर्णा सोनोले, दिपाली काटोने, पक्षाचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला बचत गटांच्या सदस्य महिला व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.