
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर
चंद्रपुर :- कर्तव्य दक्ष चंद्रपुर जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता चंद्रपुर जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक अरविंद साळवे पदभार सांभाळणार आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी चंद्रपुरला येण्याआधी गडचिरोली मध्ये होते.
जुलै २०१८ पासुन त्यांनी चंद्रपुर जिल्ह्याचा कार्यभार सांभाळला. गेल्या काही महिनाभरापासुन त्यांची बदली होणार असल्याची चर्चा सर्वत्र होती. आता मात्र महिनाभरानंतर त्यांच्या बदलीचे आदेश आले आहे. चंद्रपुर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या एकाचवेळी बदली होईल, असे भाकित वर्तविण्यात येत होते.
चंद्रपुरात नव्याने दाखल होणारे अरविंद साळवे हे भंडारा येथे कार्यरत आहेत. ते फेब्रुवारी २०१९ रोजी भंडारा येथे रुजु झाले होते. अरविंद साळवे यांनी यापुर्वी अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस अधीक्षक, नवी मुंबई वाहतूक पोलीस उपायुक्त म्हणुन पदभार सांभाळला आहे, आता त्यांची पोलीस अधीक्षक म्हणुन चंद्रपुर जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे.