
नागपुर :- कामठी – मौदा विधानसभा क्षेत्राचे भाजप आमदार टेकचंद सावरकर यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहीती टेकचंद सावरकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातुन दिलेली आहे.
टेकचंद सावरकर यांनी आपल्या संदेश मध्ये म्हंटले की, २ दिवसापासुन मला अस्वस्थ वाटत असल्याने मी सेल्फ कोरंटाईन होतोच मात्र आज माझी कोरोना टेस्ट पॉजिटीव्ह आलेली आहे. तशी माझी प्रकुर्ती बरी आहे. मात्र या काही दिवसात माझ्याशी संपर्कात आलेल्या प्रत्येकानी स्वतःची कोविड -१९ ची टेस्ट करून घेणे हीच आपणांस विनंती.
या प्रकारचा संदेश टेकचंद सावरकर यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट च्या माध्यमातुन दिलेला आहे!