
5 कामगार गंभीर जखमी तर 25 जण किरकोळ
कोराडी /नागपुर : 5 नोव्हेंबर 2020 कोराडी रोड स्थित सुंदर बिस्किट कंपनी च्या जवळपास 30 कामगारांना कंपनीतुन बाहेर नेऊन सोडायला गेलेल्या बस क्र. MH – 40 Y 7429 ला आज सकाळी 6:30 वाजता च्या दरम्यान सावनेर कडुन नागपुर दिशेने येणाऱ्या ट्रक ने जोरदार धडक दिली. या अपघातात बस चालकासह इतर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत तर इतर 25 जण किरकोळ जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे.
सुंदर बिस्कीट कंपनीजवळ सर्व्हिस रोड पार करीत असताना गायकवाड ट्रेडर्स समोर या बस ला सावनेर कडून नागपूर ला येणाऱ्या ट्रक क्र MP-09 HG 7039 ने बस ला जोरदार धडक दिली. जखमी मजुरांना मेयो रुग्णालयात उपचरासाठी दाखल करण्यात आले. बस आणि ट्रक पो. स्टे. कोराडी येथे आणून जमा केले. जखमी यांचे बयान घेण्यासाठी कोराडी पोलिसांचा स्टाफ रवाना करण्यात आला असुन जखमींचा प्राथमिक ईलाज व बयान घेणे सुरु आहे.
बस चालक विलास गजभिये यांचे बयान व तक्रारीवरुन कोराडी पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुखले यांनी कोराडी पो. स्टे. येथे Crime no.500/2020, u/s 279,338,336,337, IPC r/w 134 (A) 134(B),177,184 M.V.Act नुसार गुन्हा registered केला आहे. घटनेतील ट्रक चालक घटनास्थळुन फरार झाल्याची माहिती आहे. प्राप्त माहितीनुसार, या गंभीर अपघातात बस चे अंदाजे 60 हजार रुपयाहुन अधिकचे नुकसान झाले असून बसच्या काचा फुटल्या तसेच काही सीट्स पण तुटल्या आणि फाटल्या आहेत.
पुढील तपास कोराडी पो. स्टे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुखले यांच्या मार्गदर्शनाखाली PSI चव्हाण व त्यांचे इतर सहकारी कर्मचारी करीत आहेत.