
( भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार पार्टी महा.)
वाशिम :- स्थानिक वाशिम येथील भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार पार्टी चे राज्य संघटक जगदिश भाऊ मानवतकर यांनी महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना निवेदन देण्यात आले.यामध्ये त्यांनी अतिवृष्टी झाल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे .त्यामुळे अश्या शेतकऱ्यांचे वीजबिल त्वरित माफ करावे .तसेच कोरोणाच्या काळात लॉकडाऊन असल्यामुळे त्या महिन्यातील इलेक्ट्रिक बिल माफ करावे कारण आपण तसे आश्वासन दिले होते.
म्हणून दिलेल्या आश्वासनाची आठवण करून द्यावी म्हणून हे निवेदन देण्यात आले .हे इलेक्ट्रिक बिल माफ करावे म्हणून दि.२५/९/२०२० रोजी ऑल इंडिया ब्लु टायगर सेना तर्फे संपूर्ण महाराष्ट्र ” ऑनलाईन आंदोलनं ” या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जगदिश भाई मानवतकर यांच्या मार्गदर्शनात व नेत्रूवात हे आंदोलन यशस्वी करण्यात आले होते .हे यावेळी नितीन राऊत साहेबांच्या निदर्शनात आणून दिले.
यावेळी भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार पार्टी चे राज्य संघटक जगदिश भाऊ मानवतकर,वाशिम जिल्हा प्रभारी दिलीप भाऊ गायकवाड ,जिल्हा अध्यक्ष रवी भाऊ ठोके , जिल्हा उपाध्यक्ष गौतम भाऊ कंकाळ, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष शे.तन्वीर शे.कादिर,विधी सल्लागार समिती जिल्हा अध्यक्ष ॲड.संतोष केसवानी साहेब ,ऑल इंडिया ब्लु टायगर सेना वाशिम जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वानखेडे, मुकेश ताजने,राहुल कांबळे,विकास खडसे,आकाश कांबळे यांची उपस्थिती होती.तसेच जगदिश भाऊ मित्रमंडळ वाशिम च्या कार्यकर्त्यांची सुद्धा यावेळी बहुसंख्येने उपस्थिती होती.मा.नितीन राऊत साहेब ( ऊर्जा मंत्री महाराष्ट्र ) या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बिला विषयी नक्कीच योग्य निर्णय घेतला जाईल असे आश्वासन मा. नितीन राऊत साहेबांनी यावेळी दिले.शेतकऱ्यांवर आसमानी संकट कोसळले असून त्यांच्या सोयाबीन चे भाव केंद्र सरकारने ११००० रू.वरून ५०००रू. वर आले असताना राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या वाढत्या बिलाकडे लक्ष देऊन वाढीव इलेक्ट्रिक बिल व सरसकट सर्व इलेक्ट्रिक बिल माफ करावे अशी विनंती जगदिश भाऊ मानवतकर यांनी निवेदन देऊन नितीन राऊत साहेब (ऊर्जा मंत्री ) यांच्या कडे निवेदन देऊन करण्यात आली.