
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर तालुक्यातील शंकरपुर येथील गाजत असलेले बोगस खत विक्री प्रकरणात श्री दत्त कृषी केंद्राचे संचालक राजु वैद्य 35 यांना आज शनिवार ला सायंकाळी अटक करण्यात आलेली आहे शंकरपूर येथे राजु वैद्य यांचे श्री दत्त कृषी केंद्र नावाचे फर्म आहे या फर्म मधून बी-बियाणे कीटकनाशके व खत विक्री मोठ्या प्रमाणात होत होती हंगाम सन 21 22 या कालावधीत शंकरपूर परिसरातील जवराबोडी साठगाव चिंचाळा हिवरा येथील शेतकऱ्यांनी यांच्या दुकानातून डीएपी व इतर खत खरेदी केले होते.
हे खत मिरची कापूस धान व सोयाबीन या पिकाला देण्यात आले परंतु या खताने शेतकऱ्यांना कोणताच फायदा न झाल्यामुळे परिसरातील अकरा शेतकऱ्यांनी याची तक्रार कृषी विभागाला व जिल्हाधिकारी यांना केली होती जिल्हाधिकारी यांनी तात्काळ दखल घेऊन सिंदेवाही येथील दोन शास्त्रज्ञ व जिल्हा कृषी अधिकारी यांना चौकशीसाठी पाठविले यां चौकशीत खत बनावट असल्याचे निदर्शनास आले तसेच हे खत शेतकऱ्यांनी खाजगी प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठविले होते त्यामध्ये शुन्य टक्के खत निदर्शनास आले, तसेच जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी पण खत सरकारी प्रयोगशाळा अमरावती येथे
पाठविण्यात आले होते.
प्रयोगशाळेमधुन या खतांमध्ये 0% मात्रा असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे पंचायत समिती कृषी अधिकारी यांनी बोगस खत विकत असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिस चौकीमध्ये तक्रार दाखल केली त्या तक्रारीची चौकशी केल्यानंतर राजु वैद्य यांना शेतकऱ्यांना फसवणूक बनावट खत विक्री करणे आदी कलम अंतर्गत अटक करण्यात आलेली आहे बनावट खत कुठून आणलं कुठे बनवल्या गेलं किती लोकांना विकले याची संपूर्ण चौकशी केल्यानंतर मोठे बनावट खत विक्री चे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे या तक्रारीची चौकशी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद जांभुळे करीत आहे.