Breaking News

गुन्हे शाखेच्या पथकाने केले आरोपीस अटक

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर :- एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिला फुस लावून पळवून नेल्याबाबतची घटना दिनांक १५-१०-२०२१ रोजी घटली, आरोपी नामे वैभव कुचनकर राहणार हनुमान मंदिराजवळ चंद्रपूर यांने अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची तक्रार दिनांक १६-१०-२०२१ रोजी पोलीस स्टेशन पोंभुर्णा येथे दिल्याने अप.क्र. १५१/ २०२१ कलम ३६३ भा.द.वी. अन्वये आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिडीत मुलगी ही अल्पवयीन असल्याने व सदरचे प्रकरण हे संवेदनशिल स्वरूपाचे असल्याने प्रकरणाचे गांभीर्य समजून पोलीस अधीक्षक साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना तात्काळ गुन्ह्यांचा छडा लावण्याकरीता सुचना देण्यात आले. त्यानुसार पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ स.पो.नि.जितेंद्र बोबडे यांचे नेतृत्वात एक पथक तयार केले.

या प्रकरणातील आरोपीने पिडीत मुलीला नागपूरच्या दिशेने पळवून नेल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाल्याने गुन्हेशाखेच्या पथकाने आरोपीचा पाठलाग करीत मार्ग काढीत नागपूर गाठून आरोपीतास ताब्यात घेवून पिडीत मुलीची सुटका करून चंद्रपूर येथे आणण्यात आले आहे.

पुढील कार्यवाही सबंधीत पोलीस स्टेशन पोंभूर्णा करीत आहे. सदरची यशस्वी कामगीरी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे चंद्रपुर व अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात पो.नि. बाळासाहेब खाडे स्थानिक गुन्हे शाखा, स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे स.पो.नि.जितेंद्र बोबडे, पोलीस अंमलदार पो.कॉ.व्यंकटेश नलगोंडावार /३९५, म.पो.कॉ.हुजबाना पठाण/२७४१, पो.स्टे.पोंभूर्णा यांनी केली.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

पोलिस भरती प्रकियेदरम्यान वाहतूक व्यवस्थेत बदल

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 18 : जिल्हा स्टेडियम, चंद्रपूर येथे 19 जून ते 19 …

शेवगांव तालुक्यातील एरंडगाब भागवत येथील एक बिग बुल फरार के. बी. कॅपिटल्स या नावाने बोगस कंपनी स्थापन करून घातला शेकडो लोकांना 25 कोटी रुपयांना गंडा

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव तालुक्यातील भागवत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved