
वंचीत आघाडी व सरपंचानी वेधले जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष-
धरणे,उपशोन,रास्ता रोको चा दिला इशारा
प्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी (प्र)
दवलामेटी(प्र)वाडी नजीक अमरावती महामार्गावरील ग्रा.प दवलामेटी क्षेत्रातील झोपडपट्टी धारकांना 40 वर्षांपासून निवास करून ही मालकी हक्काचे पट्टे वितरित न करण्यात आल्याने येथील नागरिकांत शासन व प्रशासना विरोधात तीव्र असंतोष पसरला असून लवकरच योग्य कार्यवाही न केल्यास वंचीत बहुजन आघाडी तर्फे तीव्र आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा वंचीत बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष विलास वाटकर व ग्रा.प च्या सरपंच रिता उमरेडकर यांनी वाडी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
या संदर्भात रिता उमरेडकर,विलास वाटकर व ग्रा.प सदस्य प्रकाश मेश्राम यांनी सांगितले की ही वसाहत स्थापन होऊन 40 वर्षा पेक्षा अधिकचा कालावधी झाला आहे.या दरम्यान आता पर्यंत ग्रा.प ,जिल्हा परिषद,आमदार ,खासदार राज्यशासन ,केंद्र शासना च्या माध्यमाच्या विविध योजनेतून या भागात घरकुल व अन्य विकासाची कामे झाली आहे.महाराष्ट शासनाच्या 2002 व 2018 च्या झोपटपट्टी नियमितीकरना च्या जी आर च्या निकषात हा परिसर बसत असूनही व वारंवार निवेदने ,विनंती ,चर्चा करूनही शासन व जिल्हाधिकारी नागपूर कार्यालयान येथील पट्टे वाटपाची कार्यवाही पूर्णत्वास नेली नाही.
खास बाब म्हणजे या परिसरात ख.क्र.63 व 79 या पैकी 63 मधील झुडपी जंगल आरक्षण हटवून तिथे भूकंडाचे प्रशासनाने नागरिकांना पट्टे वितरण केले पण 79 ख.क्र. येथील पट्टे वितरण प्रलंबित ठेवले.
ही बाब अनाकलनीय, पक्षपाती व संशय निर्माण करणारी स्पष्ट होत आहे. तसेच सातबारा वर प्रशासनाचा चुकी मुळे झुळपी जंगल शेरा लिहायचे स्पष्ट झाले आहे आणि त्याचं झुडपी जंगल चमा खोटी नोंद चे आधार घेऊन आज पर्यंत शाशना द्वारे मालकी हक्क पट्टे वितरण न झाल्याने नागरिकांना अनेक तांत्रिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शासकीय जी आर चे जिल्हा प्रशासन पालन न करून नागरिकांना दिलासा देण्यास टाळाटाळ का करीत आहे असा प्रश्नन नागरिकांना पडला आहे.
वंचीत बहुजन आघाडी ने ही बाब नागपूरच्या जिल्हाधिकारी यांना गुरुवारी निवेदन देऊन या संदर्भात लक्ष घालून तातडीने कार्यवाही ची मागणी व विनंती केली आहे.निश्चित कालावधीत कार्यवाही न झाल्यास क्षेत्रातील नागरिक अमरावती हाय वे शेजारी धरणे,उपशोन व वेळ पडल्यास रास्ता रोको आंदोलन ही करतील असा इशारा पत्रकार परिषदेत वंचीत चे जिल्हाध्यक्ष विलास वाटकर, दवलामेटी च्या सरपंच रिता उमरेडकर, जिल्हा सचिव अतुल शेंडे, शाखेचे अध्यक्ष दीपक कोर , ग्रा.प सदस्य प्रकाश मेश्राम,श्रीकांत रामटेके,अर्चना बन्सोड, संघटक रोहित राऊत, रवी पाखरे, मंगला कांबळे यांनी दिला.