Breaking News

चिमूर तालुका काँग्रेस तर्फे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजप प्रवक्ते शुधांशु त्रिवेदी यांच्या निषेधार्थ निषेध आंदोलन करण्यात आहे

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-आज दिनांक-22 नोव्हेंबर 2022 रोजी तालुका काँग्रेस कमिटी, चिमूर तर्फे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अपमान जनक व वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा जाहीर निषेध म्हणून चिमुर शहरात जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले. राज्यपाल हे संविधानिक व घटनात्मक पद असताना देखील राज्यपालाकडून राजे छत्रपती शिवाजी महाराज सावित्रीबाई फुले व राज्यातील इतरही महापुरुषांच्या विषयी नेहमी अपवादग्रस्त विधान केल्या जाते हे अतिशय निंदनीय असून भाजप नेते व सरकार मधील लोक त्यांना पाठीशी घालतात,

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुदाशू त्रिवेदी यांनी देखील शिवाजी महाराजांविषयी अपवादग्रस्त विधान केले यांचा निषेध म्हणून यावेढी आंदोलन करण्यात आले मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते यावेळी तालुका अध्यक्ष डॉ. विजय गावंडे पाटील, शहर अध्यक्ष अविनाश अगडे, तालुका सचिव विजय डाबरे,
तालुका उपाध्यक्ष राजू चौधरी, संपर्क प्रमुख धनराज मालके , मिडिया प्रमुख पप्पुभाई शेख,बाळूभाऊ बोभाटे, शहर उपाध्यक्ष अमोल जुनघरे,विधांसाभा उपाध्यक्ष युवक काँग्रेस नागेंद्र चट्टे, प्रशांत डवले,तालुका प्रभारी युवक काँग्रेस अक्षय लांजेवार इत्यादी कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

लोकांना कोट्यवधींचा चुना

* शेवगावचे मातृ तीर्थ अर्बन निधी लिमिटेड चे कार्यालय गेल्या आठ पंधरा दिवसापासून बंद * …

बेपत्ता अल्पवयीन दलित मुलींचा तात्काळ शोध घ्यावा

जिल्हा पोलीस उपअधिक्षकांची भेट-तपासात वेग असल्याची खैरे यांची माहिती विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-शेवगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved