Breaking News

Classic Layout

जिल्हाधिका-यांनी केली बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्राची पाहणी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 27 : चिचपल्ली येथील बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्राला (बीआरटीसी) जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. यावेळी तहसीलदार विजय पवार, बी.आर.टी.सी. चे वनपरिक्षेत्र अधिकारी ए.डी.मल्लेलवार, नायब तसीलदार  खंडाळे, वनपाल  कोसनकर, तलाठी  आत्राम तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी  गौडा यांनी …

Read More »

नव मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम – जिल्हाधिकारी विनय गौडा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 27 : निवडणुकीच्या प्रक्रियेत मतदार हा महत्वाचा घटक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त नव मतदारांची नोंदणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांनी या मोहिमेदरम्यान आपल्या नावाची नोंदणी करून घ्यावी व आगामी निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन …

Read More »

विजेच्या धक्क्याने होणारे वाघांचे मृत्यु रोखण्यासाठी तात्काळ उपायोजना करा

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे वनाधिका-यांना निर्देश नागपूर येथे घेतली तातडीची बैठक जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर / नागपूर, दि. 27 : विजेच्या धक्क्याने होणारे वाघांचे मृत्यू शून्य करण्यासाठी तात्काळ अभ्यासपूर्ण उपाययोजना करणेबाबत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी प्रधान सचिव, वने व राज्यातील वरिष्ठ वनाधिका-यांना नागपूर येथे झालेल्या तातडीच्या बैठकीत निर्देश दिले. …

Read More »

खंडग्रासचंद्रग्रहण जे कोण ग्रहण पाळणार असतील तर ,त्यांच्या साठी ही माहिती.

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव – 9960051755 शेवगांव:-शनिवारी दि २८/१०/२३ रोजी उत्तर रात्री 01:00 ते 2:30 चंद्रग्रहण आहे.दु ०३:१४ पासून वेध सुरू होतात पण बाल,वृद्ध,अशक्त, आजारी,गरोदर स्त्रिया सर्वांनी शनिवारी सायं ०७:४१पासून वेध पाळावेत. म्हणजेच सायं ०७:४१ पर्यंत भोजन करावे.सायं ०७:४१ नन्तर जप,वाचन,नामस्मरण, दानधर्म,अवश्य करावे.- मुख्य ग्रहण काळ रात्री ०१ते ०२:२३ आहे- …

Read More »

आठवडाभरात काढले 60494 नागरिकांचे आयुष्मान कार्ड

जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेची विशेष मोहीम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 26 : आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत लाभार्थी व्यक्तीस प्रती कुटुंब प्रती वर्ष 5 लक्ष रुपयांचा आरोग्य विमा हा 1209 उपचार/शस्त्रक्रिया करता देण्यात येतो. या योजनेंतर्गत देशातील शासकीय आणि अंगीकृत खाजगी रुग्णालयांच्या माध्यमातून मोफत लाभ पुरविण्यात येत …

Read More »

ते मुस्लिम धर्माचे आहेत, म्हणुन कामावर घेत नाहीत

मुस्लिमांना कामावर न घेणाऱ्या कंपनी विरोधात वंचित बहुजन आघाडी पुकारनार तीव्र आंदोलन प्रतिनिधी -नागेश बोरकर दवलामेटी दवलामेटी प्र:-वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देऊन, “इकॉनॉमिक्स एक्सप्लोसिव लिमिटेड ” या कंपनीच्या विरोधात निवेदन देण्यात आले. देशाचा उपराजधानी नागपूर ग्रामीण मधील बाजारगाव, शिवा सावंगा येथील …

Read More »

दवलामेटी पोट निवडणूक, चुरस पुर्ण होणारं लढत!

मतदार यादीत घोळ करणाऱ्या वर कायदेशिर कार्यवाही व्हावी नागरिक करणार मागणी प्रतिनिधी – नागेश बोरकर दवलामेटी प्र./नागपूर:-नागपूर ग्रामीण तालुका तील दवलामेटी ग्राम पंचायत या ना त्या कारनाने नेहमीच चर्चेत असते. अतिक्रमण कायदा अंतर्गत वॉर्ड क्रमांक साहा येथील सदस्य अपात्र झाल्या मुळे येणारा ०५ नोव्हेंबर रोजी निवडणूक घोषीत झाली त्या अनुसंघाने …

Read More »

विमा कंपनीने शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याबाबत कार्यवाही करावी

विभागीय आयुक्तांनी केले विमा कंपनीचे अपील खारीज पिकाच्या खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीबाबत अधिसुचना सुनावणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 25 : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पिकाच्या हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान या जोखमेच्या बाबीअंतर्गत झालेल्या नुकसानीबाबत विमा कंपनीने विभागीय आयुक्त, नागपूर यांच्याकडे दाखल केलेले अपिल खारीज करण्यात आले आहे. …

Read More »

शेतकरी आत्महत्येची 20 प्रकरणे मदतीकरीता निकाली

अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी घेतला आढावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 25: जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या प्रकरणे तपासणी समितीच्या बैठकीमध्ये शेतकरी आत्महत्येच्या एकूण 29 प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या बैठकीत 20 प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली असून 8 प्रकरणे समितीने अपात्र ठरविली आहे, …

Read More »

सर्पदंशाने शेतकरी युवकाचा मृत्यू

उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे वहाणगांव वासियांचे आंदोलन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – सध्या रब्बी हंगामाला सुरुवात झाली असून विज वितरण कंपनी कडून कृषी पंपाना रात्रौला विज दिली जाते. त्यामूळे शेतपिकाला पाणी देण्याकरीता वहाणगाव येथील शेतकरी कुमार नितिन जुमनाके या युवकास दिनांक.२३/१०/२०२३ ला रात्रौ १० :३० वाजताच्या सुमारास सर्पदंश झाल्याने …

Read More »
All Right Reserved