
नागपूर : भरधाव कारच्या धडकेत दुचाकी चालकाचा मृत्यू झाल्याची घटना वाडी पोलिस ठाणे हद्दीत घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संतोष सखाराम भोंगाडे असे मृतकाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (दि.१0) घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाडी हद्दीतील अमरावती- नागपूर हायवेवरील मारुती शोरूमसमोर उभ्या असलेल्या (एमएच ४0 / बीएम ९२६९) अँक्टिवा दुचाकीला भरधाव होंडाई कारच्या (एमएच ४९ / बीके ३११९) चालकाने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवून जबर धडक दिली. यात दुचाकी चालक संतोष सखाराम भोंगाडे (वय ४0), रा. साईनगर, दाभा हे गंभीर जखमी झाले. धडक इतकी जबर होती की दुकाची दुरपर्यंत फेकल्या गेली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या दुचाकी चालक संतोष भोंगाडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.