Breaking News

अवैद्य दारू विक्रेत्याने संपादकावर केला हल्ला

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर

चंद्रपुर :- चंद्रपुर शहरामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले असुन अवैधरीत्या दारूची विक्री करणाऱ्यांची संख्या जास्त प्रमाणात वाढत आहे.यांना पाठबळ कुणाचा? अशातच इंदिरा नगर मधिल अवैध दारू विक्री व्यवसाय करणाऱ्यांनी महाराष्ट्र मेट्रो न्यूज पोर्टल चे संपादक रोहित तूराणकर यांच्यावर चक्क तलवारीने
प्राणघातक हल्ला करून जखमी केल्याची खळबळजनक घटना काल रात्री ९.०० वाजताच्या सुमारास घडली.

या हल्ल्यामध्ये रोहित तूराणकर आणि यांच्या आईला सुद्धा दुखापत झाली असुन जर वेळीच घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली नसती तर आरोपीने जीवच घेतला असता अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. आरोपी हल्ला करून फरार झाल्यानंतर काही तासानंतर एका आरोपीला पकडण्यात तर दुसरा आरोपी फरार असल्याची माहिती आहे.

या अवैध दारूचे धंदे करणाऱ्या दोघांना विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून त्यांना तडीपार करण्यात यावे अशी मागणी होत आहे,या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक हाके यांच्या नेत्रुत्वात सुरू असुन दुसऱ्या आरोपीला लवकरच पकडून पी सी आर घेण्यात येईल असे पोलिस सुत्रांकडून कळते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

स्वदेशी वापरा – देश वाचवा !* *आयुर्वेदिक वापरा – निरोगी रहा !*

*स्वदेशी वापरा – देश वाचवा !* *आयुर्वेदिक वापरा – निरोगी रहा !*

जीर्ण इमारतीत विद्यार्थ्याचे ज्ञानार्जन माजी सभापती च्या पत्राला केराची टोपली

शंकरपूर- चिमूर तालुक्यात चिचाळाशास्त्री येथे जीर्ण व पडक्या इमारतीत विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू असून विद्यार्थ्याचे जीव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved