
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर
चिमुर :- चिमूर तालुक्यातील पूयारदंड येथील रोहित राजेंद्र जांभुळे (वय१८) वर्षे या युवकाने काही दिवसांपूर्वी ऑनलाईन मोबाईल बुकींग केला होता त्याची मूळ किंमत १५ हजार रुपये होती व त्यासाठी त्याने १० हजार रुपये त्या कंपनीला ऑनलाईनच्या माध्यमातून दिले होते व उर्वरित ५ हजार रुपये मोबाईल पार्सल आल्यानंतर पोस्ट मार्फत पार्सल स्वीकारून पोस्ट विभागाला देऊन पार्सल घ्यायचे होते. यासाठी युवकाला पोस्टातुन फोन आला.
युवकाने पार्सल सोडविण्यासाठी पैसे नसल्याने आईकडे पैशाची मागणी केली. आईने पैशाची जुडवाजुडव करूण मुलासोबत पोस्टामध्ये पार्सल सोडवायला गेले. सर्व प्रक्रिया पूर्ण करून कंपनीने पाठविलेले पार्सल आईने व मुलाने खोलुन बघीतले असता त्या पार्सलमध्ये मोबाईल ऐवजी २ पॉकेट, १ बेल्ट व खाली खरडा अशी बिनकामाची वस्तू आढळल्याने आपली मोबाइल कंपनीकडून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कंपनीच्या संपर्क क्रमांकावर फोन केला, परंतु त्या कंपनीला फोनच लागत नव्हता.
घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याने १५ हजार रुपयांचा भुदंड बसल्याने घरचे आई वडील नाराज झाले होते या युवकाने या गोष्टीचा मनावर फार मोठा परिणाम करून घेतला. मुलगा काल ३ वा.पासून घरातून गायब होता. आई वडीलाने नातेवाईक, मित्र परीवाराकडे विचारपूस केली असता. त्याचा कुठेच पत्ता लागला नाही. आज दि. ९/१०/२०२० ला १०-११ च्या दरम्यान गावातील शेतकरी व महीला शेतात जात असतांना त्या मुलाची गाडी व त्या मुलाचे कपडे विहीरीजवळ दिसल्यामुळे विहिरीत त्याचा शोध घेतला असता.
त्याचा मृतदेह सापडला. रोहीत ने कमरेला दगडाने भरलेली पोतळी बांधून विहीरीत उडी घेऊन आपला जीव संपविला या घटनेने सर्वत्र परिसरात हळहळ व्यक्त होत असून त्या मोबाईल कंपनीचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी गांवकरी व कुटुंबातील व्यक्तींकडून केली जात आहे.