
नागपुर :- उच्च तंत्रज्ञान रोपवाटिका सेमिनरी हिल्स, नागपूर येथे वनसंरक्षक सामाजिक वनीकरण वृत्त नागपूर, विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग, नागपूर तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनीकरण परिक्षेत्र नागपूर या कार्यालयातील सर्व अधिकारी/कर्मचारी यांनी भारताचे संविधान प्रास्ताविका वाचून २६ नोव्हेंबर संविधान दिवस साजरा केला.
यावेळी डॉ. के.एस.मानकर, वनसंरक्षक, श्रीमती गीता नन्नावरे विभागीय वन अधिकारी, दिपक पाटील लिपीक, श्रीमती निशा देशमुख वनपाल यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे संचालन तसेच आभार प्रदर्शन श्री. मनोज मोहिते, वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी केले.