Breaking News

ताडोबा फिरायला गेले नागपुर चे अग्रवाल कुटुंबाचा चंद्रपुर मध्ये अपघात

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर

चंद्रपूर : – आज नागपूर वरून ताडोबा अभयारण्यातील कोलारा जवळील देवरी येथील वन्यविलास या रिसॉर्ट मध्ये ऑनलाईन बुकिंग करून ताडोबा जंगल सफारी करीता जात असतांना सकाळी ११ वाजून १५ मिनिटांनी चिमूर जवळील बांबू रिसॉर्ट पासून ५०० मिटर अंतरावरील तुकुमचा भडगा नाला मध्ये फोर्ड कंपनीची एन्डोव्हर कार पलटी झाली या अपघातात १२ वर्षीय सना अभिषेक अग्रवाल राहणार नागपूर जागीच मृत्यू झाला.

एस या आकाराचे वळणमार्ग असल्याने नव्याने रोडचे काम सुरू आहे. चालकाचे वाहनवरून नियंत्रण सुटल्याने कार नाल्यात पलटी झाली यात मुलगी जागीच मरण पावली व मुलीचे काका अमिनेश अशोक अग्रवाल वय ४० वर्षे यांना नागपूर येथे अँबूलन्सने उपचाराकरिता नेताना उमरेड जवळ वाटेत मृत्यू झाले.

तर या कार मध्ये चालक ज्ञानेश्वर वसंता नरड वय ३८ वर्षे सह मिनू अमिनेश अग्रवाल ३२ वर्षे , नेहा आशिष अग्रवाल वय ३६ वर्षे , ईशु अनिमेश अग्रवाल वय १७ वर्षे असे एकूण ६ जण होते.या सहा पैकी २ जनांचे मृत्यू झाले असून ४ जणांवर उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे उपचारासाठी दाखल करून पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलवण्यात आले आहे. पुढील तपास चिमूर पोलीस स्टेशन करीत आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

स्वदेशी वापरा – देश वाचवा !* *आयुर्वेदिक वापरा – निरोगी रहा !*

*स्वदेशी वापरा – देश वाचवा !* *आयुर्वेदिक वापरा – निरोगी रहा !*

जीर्ण इमारतीत विद्यार्थ्याचे ज्ञानार्जन माजी सभापती च्या पत्राला केराची टोपली

शंकरपूर- चिमूर तालुक्यात चिचाळाशास्त्री येथे जीर्ण व पडक्या इमारतीत विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू असून विद्यार्थ्याचे जीव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved