
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील बाम्हणी येथे दिनांक ३०/०५/२०२० रोजी फिर्यादी नामे शंकर नथ्यु बोबडे वय ५० वर्षे, धंदा-शेती, रा. बामणी ता. चिमूर जि. चंद्रपूर यांचे येथील सोन्याचे दागीने रोख रक्कम चोरीला गेले होते त्याबाबत फिर्यादीचे तक्रारीवरुन पो.स्टे. चिमूर येथे अप क्र. १९२/२०२०कलम ३८० भा.दं.वि. दाखल झाला होता. सदर गुन्हयामध्ये तपासी अधिकारी पो.उपनि. अलिम शेख पो.स्टे. चिमूर व त्यांच्या पथकाने गुन्हयातील आरोपीचा शोध घेऊन चोरीस गेलेली मालमत्ता १) एक सोन्याची गोफ वजन १४.९०० मि.ली. ग्रॅम किंमत अंदाजे १३,००० रु. २) एक सोन्याची गोफ व लॉकेट वजन १५.४७० ग्रॅम किंमत १४,००० रु. ३) एक सोन्याची बदामी अंगठी वजन ४.९९० ग्रॅम किंमत अंदाजे ४,००० रु. ४) एक सोन्याची जेन्टस अंगठी वजन ५.२२० ग्रॅम किंमत अंदाजे ४,६०० रु. ५) एक सोन्याची लेडीज अंगठी वजन २.८४० ग्रॅम किंमत अंदाजे २,५०० रु. ६) एक सोन्याची फॅन्सी नथ वजन १.७४० ग्रॅम किंमत अंदाजे १,५०० रु. ७) एक सोन्याची फॅन्सी विरी वजन ३,६२० ग्रॅम किंमत अंदाजे ३,००० रु. ८) एक सोन्याचे डबलसरी पोत वजन २६.५०० ग्रॅम किंमत अंदाजे २४,००० रु. ९) एक सोन्याचे पिटी मनी डबलसरी पोत वजन २७.०० ग्रॅम किंमत अंदाजे २५,००० रु. असे एकुण वजन १०२.२८ ग्रॅम अंदाजे किंमत ९१,६०० रु. तसेच ५०० रु. च्या ४० नोटा एकुण २०,००० रु. एकुण किंमत ०१,११,६०० रु. चा मुद्देमाल हस्तगत केला.
सदर गुन्हयातील फिर्यादी हे गरीब शेतकरी असुन त्यांनी आयुष्यभर स्वकष्टाने कामावलेली मिळकत पोलीसांच्या अथक परिश्रमाने व मोठया शिताफीने परत मिळविली. सदरची मालमत्ता मा. न्यायालयाचे आदेशाने उपविभागीय पोलीस अधिकारी चिमूरचे बंगाटे सर यांचे हस्ते तसेच पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे व तपासी अधिकारी पो.उपनि: अलिम शेख यांच्या उपस्थितीत आज दिनांक ३०/१२/२०२० रोजी फिर्यादीला प्रदान करण्यात आली. व फिर्यादीस चोरीस गेलली मालमत्ता परत मिळवुन देऊन त्यांच्या जिवनातील आनंद परत-मिळवून दिला आहे पोलिसांनी वेळीच तपासाची दिशा देत चोर व मुद्देमाल शोधून काढले त्यामुळे मालधणी शेतकऱ्यांचा सोने व रोख रक्कम परत मिळविता आली त्यामुळे चिमूर पोलिसांचे कौतुक केले जात आहे .