टूनकी बातमीदार –
मृगबहार येण्याकरिता जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा दुसरा आठवडा या कालावधीत संत्रा बागेतील जमिनीमध्ये भरपूर ओलावा असणे आवश्यक आहे. या कालावधीत किमान २०० ते २५० मि.मी. पाऊस पडलेला असावा. जर या कालावधीत पाऊस १५० मि.मी.पेक्षा कमी पडल्यास बहार येण्यामध्ये अडचणी निर्माण होतात. मृग नक्षत्राचे पहिले एक दोन पाऊस जोराचे ४० ते ५० मि. मी.असावेत तसेच या कालावधीत ढगाळ वातावरण राहून ५ ते ६ दिवसांची पावसाची झड असावी. तसेच हवेतील आर्द्रता ८o ते ९० टक्के असणे जरुरी आहे आणि सरासरी तापमान २७ ते २९ अंश सें.ग्रे. असावे. अशा अनुकूल हवामानात संत्र्याला मृगबहार येतो. परंतु ही अनुकूल परिस्थिती निसर्गाच्या लहरीपणामुळे या वर्षी उपलब्ध होत नसल्यामुळे तालुक्यातील संत्रा बागा न फुटल्याने शेतकरी धास्तावलेले दिसत आहेत. संग्रामपुर तालुक्यात सोनाळा, बावनबीर महसुल मंडळात संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. या वर्षी हवामान विभागाच्या अंदाजा नुसार मान्सुन राज्यात जुनच्या पहिल्या च आठवडयात दाखल होण्याचे संकेत हवामान विभागाने दिल्याने शेतकऱ्यांनी जमीनीची पोत पाहुन आपापल्या संत्रा बागा तळणावर सोडल्या होत्या. मात्र जुनच्या पहिल्या च आठवडयात अपुरा पाऊस पडल्याने जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाला नाही आणि गेल्या पंधरवाडयापासुन तापमाणात प्रचंड वाढ झालेली असल्यामुळे संत्रा बागाना फुलधारणा न झाल्याचे चित्र पाहायला दिसत आहे. अपुरा पाऊस आणि तापमाणात प्रचंड वाढ यामुळे संत्रा बागा बहारत नसल्याचे चित्र तालुक्यात पाहायला मिळत आहे. तालुक्यात अपुऱ्या पावसाअभावी सोयाबीन, कापुस, मका पिकांना सुध्दा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला दिसत आहे. काही शेतकऱ्यावर दुबारा पेरणीचे संकट ओढावलेले आहे. तालुक्यात लहरी स्वरूपाचा पाऊस पडत असल्याने खरीप हंगाम धोक्यात आलेला आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी सार्वत्रीक पावसाची आतुरतेने वाट पाहतांना दिसत आहेत.
५ मे पासुन सत्रा झाडाना तळणावर सोडले होते. जुनच्या पहिल्या च आठवडयात अपुरा पाऊस पडल्याने जमिनीत पुरेशी ओल राहीली नाही. त्यात तापमानात प्रचंड वाढ झाल्याने झाडांना दरवर्षी प्रमाणे फुलधारणा झालेली दिसुन राहीली नाही. त्यामुळे बदलत्या हवामानाचा चांगलाच फटका सत्रा बागाना झालेला दिसत आहे.
– सागर साबे, सत्रा उत्पादक शेतकरी लाडणापुर