
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर
चिमूर :- नेरी नवरगाव मार्गावर नेरी येथील मधुकर वाघे यांचे घराला दिनांक ३डिसेंम्बर गुरुवारी पहाटे ३ते ३:३० वाजता दरम्यानच्या सुमारास अचानकपणे लागलेल्या आगीत सम्पूर्ण घरातील आलमारी,त्यातील दस्तऐयवज 70 हजार रुपये सोने चांदी जाळून खाक झाली आग पहाटे लागल्यामुळे नागरिक झोपले होते कसे तरी घरच्या लोकांनी आपले जीव वाचवले आणि बाहेर पडले आग इतकी भयानक होती की विजवण्यापर्यंत संपूर्ण जळुन खाक झाले त्यामुळे वाघे कुटूंब उघड्यावर आले.
या घटनेची नेरी भाजपा कार्यकर्ते संदीप पिसे व कार्यकर्ते याना माहिती होताच त्यांनी घटनास्थळी जाऊन आमदार बंटीभाऊ भांगडिया यांना माहिती दिली त्यांनीही दूरध्वनीवरून प्रशासनाला तात्काळ माहिती कळवली. सदर कुटूंब हे उघड्यावर आल्यामुळे व आगीत संपुर्ण खाक झाल्यामुळे त्यांच्या हातात काहीच राहिले नसल्यामुळे या क्षेत्राचे आमदार भांगडिया यांनी तात्काळ या नुकसानग्रस्त वाघे कुटूंबाला किराणा कपडे व आर्थिक मदत कार्यकर्त्याच्या हाताने दिली आणि सामाजिक मदतीचा वसा कायम ठेवून माणुसकीचा परिचय दिला यावेळी मदत देताना.
मनोजभाऊ मामीडवार जी.प.सदस्य,पिंटू खाटीक तालुका महामंत्री भाजयुमो,श्रीकांत कामडी शक्तिकेंद्र प्रमुख ,हर्षल कामडी रवीभाऊ पिसे आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.