Breaking News

तहसील कार्यालयाला मनसे तालुका अध्यक्ष वैभव डहाणे यांनी ठोकले कुलूप

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर

वरोरा :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष वैभव डहाणे यांच्या नेतृत्वाखाली मागीलकाही दिवसापासून अवैध रेती तस्करी करणाऱ्यांच्या विरोधात सतत आंदोलन सुरू केले असून मागीलकाही दिवसापूर्वी त्यांनी टॉवरवर चढून विरूगिरी करीत आंदोलन केले होते. त्या आंदोलनाची दखल घेवून उपविभागीय अधिकारी शिंदे यांनी वरोरा तालुक्यातील रेती घाटावर दक्षता पथक चौकी तयार केले पण त्यानंतरही अवैध रेती तस्करी थांबली नाही. पर्यायाने ट्रक्टर द्वारे रेती शहरात खुलेआम विकल्या जात आहे. अशाच एका ट्रक्टर ने आज सकाळी वरोरा शहरातील अभ्यंकर वार्ड येथे दोन बाईकस्वारांना जोरदार धडक दिल्याने दीपक खोब्रागडे गंभीर जखमी झाले. चंद्रपूर येथे उपचारासाठी नेत असतांना वाटेत एकाचा मृत्यू झाला तर दुसरा मुलगा मंथन बावने याला रुग्णालयात भरती करण्यात आले.

या प्रकरणाची दखल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष वैभव डहाणे यांनी घेतली व ज्या उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी अवैध रेती तस्करी करणाऱ्यांवर कारवाई केली नसल्याने आजही रेती तस्करी होत आहे हे स्पष्ट झाल्याने त्यांनी आपल्या समर्थका सह तहसीलदार यांच्या कार्यालयाला कुलूप ठोकून निषेध केला दरम्यान प्रहार चे किशोर डुकरे यांच्या सह उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन निषेध केला.

या प्रसंगी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, जिल्हा सचिव विनोद सोनटक्के, शहर अध्यक्ष शरद मडावी. शहर उपाध्यक्ष मोहसीण सय्यद व इतर मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रकरणी ट्रक्टर चालक मालक यांच्यावर वरोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वरोरा पोलीस पोलीस करीत आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

स्वदेशी वापरा – देश वाचवा !* *आयुर्वेदिक वापरा – निरोगी रहा !*

*स्वदेशी वापरा – देश वाचवा !* *आयुर्वेदिक वापरा – निरोगी रहा !*

जीर्ण इमारतीत विद्यार्थ्याचे ज्ञानार्जन माजी सभापती च्या पत्राला केराची टोपली

शंकरपूर- चिमूर तालुक्यात चिचाळाशास्त्री येथे जीर्ण व पडक्या इमारतीत विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू असून विद्यार्थ्याचे जीव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved