
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- वरोरा, चिमूर रोडचे राष्ट्रीय महामार्गाचे काम एस.आर. के. कंट्रक्शन कंपनीकड़े आहे परंतु चांगल्या डाबंरीकरण रोडचे खोड़काम करुण रस्त्याचे तीन तेरा करण्यात आले आहे. ही कंपनी जनतेच्या कोणत्याही सत्कार्यासाठी नसुन येथील परिसरातील जनतेच्या जीवावर उठली असल्याचे चित्र दिसुन येत आहे.
आज २३ सप्टेंबरला दुपारच्या सुमारास पाहायला मिळाले असुन भरधाव वेगाने जात असलेल्या एस.आर.के. कंपनीच्या ट्रकने एका दुचाकी चालकास जोरदार धडक दिल्याने यात दुचाकीवर असणारे शरद जागो बदकी वय ४८ वर्ष राहणार महालगाव (बु), तालुका वरोरा यांचा पायच टुकड़ा पडला असुन त्याची प्रकृति गंभीर आहे. तर दुसरा व्यक्ती निलेश शंकर आवारी याची प्रकृति चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. तर याचा दुसरा साथीदार रूपेश वघाड़े याला कसलाही प्रकारची इजा झाली नसल्याने सुदैवने तो बचावला आहे.
सदर हे तिन्ही इसम महालगाव बु येथील रहिवासी असुन एस. आर. के. कंट्रक्शन कंपनीचा हाइवा टिप्पर ट्रक क्र AP – 02 – AT 32 90 या वहनाने जबर धडक दिली त्यामुळे हा अपघात घडला असुन सदर हायवा ट्रक शेगांव पोलीस स्टेशन येथे ताब्यात घेऊन पुढील करवाई सुरु आहे.तर गंभीर असलेल्या रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयात वरोरा येथे हलविण्यात आले.