
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- चंद्रपूर शहर पोलीस आणि वाहतुक पोलीस तर्फे आवाहन दिनांक २५ सप्टेंबर २०२० पासुन सुरु होणार वाहन तपासणी मोहिम चंद्रपूर जिल्हयातील पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांचे मार्गदर्शनाखाली वाहतुक नियमनासाठी, शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावे, त्याच बरोबर अवैध वाहन चालकांवर नियंत्रण राहावे, सुरक्षित वाहतुकीसाठी घालून दिलेल्या कार्यपध्दती पाळण्यावर भर देण्यासाठी, तसेच वाहन चोरी व तत्सम गुन्हयांवर अंकुश लावण्याकरीता पोलीस प्रशासनाच्या वतीने वाहतूक नियंत्रण शाखेसह शहर पोलीसांच्या संयुक्तविद्यमाने दिनांक २५ सप्टेंबर, २०२० पासुन चंद्रपूर शहरात वाहन तपासणी मोहीम सुरु होणार आहे.
सदर वाहन तपासणी मोहिमे दरम्यान दुचाकीसह चारचाकी वाहन चालक यांच्याकडील वाहन चालन परवान्याची वैद्य व वाहनांचे आवश्यक कागदपत्राची, वाहन चालवितांना मोबाईलचा वापर, नियमानुसार नंबर प्लेट आहे की नाही, कर्णकर्कश हॉर्न आदी गोष्टींची तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणी मध्ये विशेषतः वाहनांचे कमांक, वाहनांचे कागदपत्र यावर जास्त भर देण्यात येणार असुन वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. करीता, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांचे कडुन चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व जनतेला आवाहन करण्यात येत आहे की, सर्व वाहन धारकांनी वाहन चालवितांना आपल्या सोबत वाहनाचे आवश्यक सर्व कादगपत्रे सोबत ठेवावे.
पोलीस ठाणे चंद्रपूर शहर. पोलीस ठाणे रामनगर व पोलीस ठाणे दुर्गापूर,शहर वाहतूक नियंत्रण शाखा चंद्रपूर मधिल पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना वाहन धारकांनी वाहन तपासणी दरम्यान योग्य सहकार्य करावे.