
जिल्हा प्रतिनिधी/ सुनिल हिंगणकर
चंद्रपुर :- चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाली तेव्हापासून चंद्रपूर पोलीस दारूबंदीच्या कार्यवाह्या करीत आहेत. परंतु अवैद्य दारूविक्रेते हे कोणत्या ना कोणत्या मार्गाने लपून-छपून पोलीस स्टेशन चिमुर हद्दीत अवैद्य दारू आणून विक्री करीत आहे अश्यावरही चिमूर पोलिसांनी दिवस-रात्र एक करून कार्यवाही करून दारू विक्रेत्यांचे मुसके बांधले आहे. परंतु काही अट्टल दारू विक्रेते कायद्याला न जुमानता लपून-छपून दारू आणत असतात. परंतु पोलीस निरीक्षक स्वप्निल धुळे यांनी जेव्हापासून पोलीस स्टेशन चिमुरचा कार्यभार सांभाळला तेव्हापासून त्यांनी अवैध दारू विक्रेत्यांवर अंकुश लावण्याचे काम केलेले आहे.
याचाच एक परीचय म्हणून चिमूर पोलीस अवैध दारूविक्रेत्यांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून असतांनां एक सिल्वर रंगाची टाटा इंडिका चारचाकी वाहन क्र MH-31-CP-5651 ही गाडी सीर्सी वरून चिमूर कडे दारूच्या पेट्या घेऊन येत असल्याची माहिती मिळाल्यावरून चिमूर पोलिसांनी सापळा रचून वाहनाचे शोधात असतांना दि. 31/10/2020 चे सकाळी चार ते पाच वाजता दरम्यान चिमूर पोलिसांनी वडाळा पैकू येथे सिल्वर रंगाची गाडी टाटा इंडिका MH-31-CP-5651 या वाहनांमधील तीन इसम व समोर पेट्रोलिंग करिता बजाज CT-100 MH 40 AV 3848 या वाहनांमधील दोन इसम मिळुन आल्याने ताब्यात घेऊन त्यांचे ताब्यातील टाटा इंडिका गाडी मध्ये 12 देशी दारूच्या पेट्या (576) निपा असा एकूण 4,65,200 रु चा मुद्देमाल मिळून आल्याने सदर मुद्देमाल हा चिमूर गावातील दारू तस्कर प्रमोद बोरकर, रा चिमूर याने बोलवला असल्याची कबुली दिल्याने देशी दारुचा माल आणणारे रामराव झगडे, सुरज काकडे, प्रफुल कवाडे, अमित घाटुर्ले, सर्व रा. पिपरा, ता. उमरेड, जि. नागपूर व प्रमोद बोरकर, रा. चिमूर या आरोपीवर गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली असून आरोपींना कोर्टात हजर केले असता तीन दिवसाचा मंजूर केलेला आहे.
सदरची कारवाही पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे ठाणेदार चिमूर यांचे मार्गदर्शनात पोहवा विलास निमगडे, पोशी सचिन गजभिये, विनायक सरकुंडे, शैलेश मडावी यांनी पार पाडली.