Breaking News

Monthly Archives: September 2021

दोन दिवसा करिता नागपूर जिल्ह्याला येलो अलर्ट

भारतीय हवामान खाते यांचा सतर्कतेचा इशारा दिनांक २१ व २२ सप्टेंबर रोजी अतिवृष्टी चा इशारा नागपुर:-भारतीय हवामान खाते (IMD) यांनी विदर्भा करिता दिनांक २१ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर २०२१ या कालावधी साठी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून नागपूर जिल्ह्याला दिनांक २१ व २२ सप्टेंबर या कालावधी करिता येलो अलर्ट देत …

Read More »

नांद आणि वडगाव धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू- नदीकाठच्या जनतेनी सावध राहण्याचे कार्यकारी अभियंता यांचे आवाहन

-नांद आणि वडगाव धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू- हिंगणघाट :- वडगाव आणि नांद या दोन्ही धरणाचे दरवाजे आवश्यकतेनुसार उघडण्यात आल्याने वणा नदीच्या पात्रात या धरणाच्या पाण्याचा विसर्ग होत असल्याने वणा नदीच्या काठावर राहणाऱ्या जनतेनी सावध राहण्याची सूचना कार्यकारी अभियंता राजेश ढुमणे यांनी केली आहे.आज दि २१ ला सकाळी वाजता वडगाव धरणाचे …

Read More »

घरकुलसंदर्भातील प्रस्तावांना प्राधान्याने मार्गी लावा – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याला आढावा घेण्याचे निर्देश जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 20 सप्टेंबर : आपले हक्काचे घर असावे, असे प्रत्येकाला वाटते. ‘सर्वांसाठी घरे’ योजनेंतर्गत घरकुल उपलब्ध करून देण्याला शासनाने प्राधान्य दिले आहे. त्यानुसार घरकुलासंदर्भात आलेल्या प्रस्तावांना त्वरीत निकाली काढून गरजूंना घरकुलाचा लाभ द्यावा, असे निर्देश मदत व पुनर्वसन, …

Read More »

आरोग्य विभागाच्या बनावट वेबसाईटपासून उमेदवारांनी सावध राहावे-जिल्हाधिकारी

नागपूर दि.२० : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाची बनावट (बोगस ) वेबसाईट तयार करून त्यावर विविध पदासाठी पदभरती करण्याचे आवाहन करण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. ही वेबसाईट बोगस असून जिल्हा परिषद नागपूरचा या वेबसाईटशी संबध नाही,उमेदवारांनी अशा वेबसाईट पासून सावध असावे, असे आवाहन निवड समितीच्या अध्यक्षा तथा जिल्हाधिकारी विमला आर. …

Read More »

महिलांसाठी आज विशेष लसीकरण मोहिम पालकमंत्र्यांच्या पुढाकारात जिल्हा व महापालिका प्रशासन सज्ज

नागपूर, ता. 20 : नागपूर जिल्ह्यातील 18 वर्षांवरील सर्व महिलांसाठी कोरोना लसीकरणाची विशेष मोहिम उद्या (21 सप्टेंबर) राबविण्यात येणार आहे. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतील विशेष मोहिम राबविण्यासाठी जिल्हा व महापालिका प्रशासन सज्ज आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केल्याने नागपूर जिल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राखण्यासाठी पालकमंत्री …

Read More »

ताजबाग परिसराच्या अतिरिक्त कामासाठी सुधारित प्रस्ताव सादर करा-पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

प्रतिनिधी/नागपूर नागपूर, दि. 20 : बाबा ताजुद्दीन यांच्या मुख्य दरबाराच्या बाहेरील वऱ्हांडा, दर्ग्याच्या बाहेरील भिंतीचे सौंदर्यीकरण यासह मुख्य दर्ग्याच्या बाहेरील प्लॅटफॉर्मवर मेन दर्ग्याच्या बाहेर लावण्यात आालेल्या इन्ले फ्लोअरिंग लावण्यासह मोठा ताजबाग परिसरातील अतिरिक्त कामासाठी सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ताजबाग …

Read More »

आजपासून राष्ट्रीय जंतनाशक आठवडा 1 ते 19 वयोगटातील मुलामुलींना देणार जंतनाशक गोळ्या

नागपूर दि. 20 : 21 ते 28 सप्टेंबर या दरम्यान राष्ट्रीय जंतनाशक आठवडा राबविण्यात येणार आहे. जंताच्या प्रादुर्भावामुळे कुपोषण आणि रक्तक्षय होऊन सतत थकवा जाणवतो. शारिरीक व मानसिक विकास पुर्ण होत नाही म्हणून वय वर्ष 1 ते 19 वयोगटातील सर्व मुला-मुलींना शाळा, महाविद्यालय या संस्था स्तरावर तर समुदाय स्तरावर जंतनाशक …

Read More »

सीताबर्डी येथील जुन्या पुस्तक विक्रेत्यांना मेट्रोने जागा उपलब्ध करून द्यावी-पालकमंत्री

नागपूर, दि. 20 : सीताबर्डी येथील वर्षानुवर्ष जुनी पुस्तके विकणाऱ्या दुकानदारांना मेट्रोने पुस्तक विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिले. स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांना तसेच विविध क्षेत्रातील संशोधक व अभ्यासक मोठ्या प्रमाणावर जुनी पुस्तके विकत घेतात. अनेक वर्षापासून हे पुस्तक विक्रेते करत असलेल्या व्यवसायाचे नुकसान …

Read More »

मंगळवारी महिलांसाठी विशेष लसीकरण मोहिम मनपाच्या १५५ केंद्रांवर व्यवस्था

नागपूर ता. २० :- कोरोनाच्या संक्रमणाची साखळी खंडीत करण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरणावर भर देण्यात येत आहे. याच श्रृंखंलेमध्ये आता महिलांसाठी लसीकरणाची विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. पालकमंत्री डॉ.नितीन राउत यांच्या सूचनेनुसार मंगळवारी २१ सप्टेंबर रोजी शहरातील महिलांसाठी विशेष लसीकरण मोहिम राबविली जाणार आहे. याअंतर्गत मनपाच्या १५५ केंद्रांवर महिलांचे लसीकरण केले …

Read More »

पाच लक्ष पंचाहत्तर हजार रुपयांचा मुद्देमालासह चार आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- लोखंडी पाईप गॅस कटरच्या सहाय्याने कापुन चोरी केल्याची घटना चंद्रपूर मधील जुनी किटाळी रोड WCL पदमापूर परीसरात घडली. दुर्गापूर पोलीसांनी तपासाला गती देत चौकशी करून चार आरोपीला अटक केली. अटक करण्यात आलेले आरोपी जग्गा ऊर्फ जगराखन बिंदे सिन्हा, वय 39 वर्षे रा. समतानगर,मो. …

Read More »
All Right Reserved